लहान सल्ला…
हा लहानसा सल्ला तुमच्या डोक्यात अगदी फिट बसेल बघा…! आणि फिट बसला तर तुम्ही हिट झालात म्हणून समजा….
आपला व्यवसाय सुरु करताना काहीतरी विचार करणे… स्वप्न पहाणे… ध्येय ठरवणे हे अगदी साहजिक आहे. पण अनेकदा लहान-मध्यम व्यावसायिक स्वप्न पहात्ताना, ध्येय ठरवताना देखील अगदीच लहान-मध्यम विचार करतात. आणि मग पुन्ह पुन्हा तेच तेच गोल गोल फिरणे चालू राहते… आणि मग पर्यायाने अनेक वर्षे टिपिकल मिडल क्लास रडगाणे रडत राहतात.
यावर माझा एक लहानसा सल्ला… विचारच करायचा ना मग तो अगदी मोठा, भव्य दिव्य करायला काय हरकत आहे. तुमच्या यशाची सुरुवात तुमच्या विचारांपासून होते. सो, इतका भव्य विचार करा कि ऐकणारे हसले पाहिजेत आणि त्यांनी तुम्हाला वेड्यात काढायला पाहिजे.
असा मोठा भव्य विचार करून यशस्वी झालेली अनेक मोठी नावे सांगता येतील… त्यापैकी एक Richard Branson यांनी वयाच्या 16 व्या वर्षी आपला पहिला व्यवसाय सुरु केला आणि तो होता Student नावाचे एक साधे मासिक. पण तेंव्हा त्यांनी आपला भव्य निश्चय केला कि मी हजारो करोडो रुपये कमवेन. आज वयाच्या ७० व्या वर्षी आपल्या व्हर्जिन उद्योगसमूहात 400 कंपन्यांचा समावेश असलेले रिचर्ड यांची सध्याची एकूण संपत्ती आहे तब्बल ५०००० कोटी…
चला तर मग, मोठा विचार करण्याचा हा लहान सल्ला तत्काळ अमलात आणून महान परिणाम अनुभवायला सिद्ध व्हा…! सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!!
आपला मित्र-हितचिंतक
Multi-dimensional Mentor
BrandBond Nilesh

