शरद पवार व्यापारी मित्रांसाठी एक आदर्श धडा : संजय डागा

♦ शरद पवार ♦

व्यापारी मित्रांसाठी एक आदर्श धडा 

 

व्यवसाय करीत असताना अत्यंत मेहनत करून, अनेक वर्ष काम करून आपण व्यवसाय नावलोंकीकाला आणतो, आपण व्यवसायात जम बसवितो, आपली कंपनी मोठी करण्याचं प्लॅनिंग करतो, त्यासाठी अनुभवी मॅनेजरची टीम तयार करतो व त्यांच्या विश्वासावर आपल्या कंपनीचं भवितव्य ठरत असतं

…. अन अचानक एक दिवस दहा पैकी तीन सिनियर्स आपल्याला एक महिन्याची नोटीस देतात की आम्ही तुमची कंपनी सोडणार आहोत . व्यावसायिक चिंताग्रस्त होतात, ज्यांना कित्येक वर्ष प्रशिक्षण देऊन घडविले आहे, ज्यांच्या जीवावर आपल्या कंपनीचं पुढील भवितव्य अवलंबून आहे ते जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा ठेवत आहेत या प्रसंगात तुम्हाला तयारीला किमान एक महिन्याचा वेळ व 80 टक्के जुने सहकारी उपलब्ध असतात तरी आपण गोंधळतो.

….आता पहा शरद पवार साहेबांबद्दल : अचानक 80 टक्के सीनियर व्यक्ती, अत्यंत विश्वासातील कोर टीम, ज्यांच्यावर पक्षाची बांधणी करण्याची जबाबदारी होती. त्यांनी यापुढे काम करण्यास नकार दिला, तोही अत्यंत अचानक अन पवार साहेबांचे वय आहे 83. ते चिंताग्रस्त होऊन शांत बसले नाहीत. कारण त्यांना नक्की माहिती होते, माणूस हा तेव्हाच हरतो जेव्हा तो लढायला नकार देतो.
आणि शरद पवार साहेब तर कसलेले सेनापती पुनश्चन नवीन बांधणीला सुरुवात…..
उत्साह तर तीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा. कारण त्यांना माहीत होतं, परिस्थिती काहीही असो “आत्मविश्वासाच्या बळावरच आपण त्यातून मार्ग काढू शकतो” व त्यांच्या पाठीशी सहा दशकांचा अनुभव होता. अनुभव हा अत्यंत अनमोल असतो.

प्रसंग दुसरा म्हणजे पार्ट 2 :

……. व्यावसायिक म्हणून तुम्ही नवीन टीम घेतली आहे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करीत आहात. दोन दशक कष्ट करून कमावलेले कंपनीचे नाव व बोधचिन्ह ही तुमची व्यावसायिक ताकद आहे व अचानक कोणीतरी एक पार्टनर त्यावरही हक्क सांगतो. विचार करा किती दयनीय अवस्था, भविष्याबाबत पूर्ण अंधार, संपूर्ण कंपनीत अत्यंत उदासीन वातावरण, काही ग्राहकही तुटत आहेत, तुमचा कॅश फ्लो डिस्टर्ब होत आहे, बिझनेस प्लॅनिंग पूर्णतः कोलमडून पडत आहे, डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कची तर वाट लागली आहे अशा परिस्थितीत हतबल होऊन तुम्ही काय
निर्णय घेतला असता ? खरंच एकदा विचार करा व्यवसायामध्ये आज न उद्या कधीतरी अत्यंत कठीण प्रसंग येऊ शकतात त्यासाठी आजच मनाची तयारी करा .

……अशा अत्यंत कठीण प्रसंगात अडचणींच्या डोंगर पाहून शरद पवार साहेब डगमगले नाहीत तर त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली .नवीन नाव , नवीन बोधचिन्ह घेतले . त्यांची सर्वात मोठी ताकद होती अत्युच दर्जाची सहनशक्ती, त्यांची राजकीय जाण, चाणाक्षपणा , धोरण ठरवून अमलात आणण्याची मोठी क्षमता या सर्व गोष्टींच्या जोरावर त्यांनी चमत्कार घडवून पुन्हा यश मिळवले. पण एक लक्षात ठेवा यासाठी त्यांना सर्वाधिक मदत झाली ती गेल्या सहा दशकात त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांनी जी मदत केली, मार्गदर्शन केले, ती लोक शरद पवार साहेब अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहिले,

खरं पाहता त्यांच्या पक्षाचे आजपर्यंत दोन अंकी खासदारही कधी निवडून आले नाहीत,म्हणजे गणिताच्या हिशोबाने अत्यंत पाठीमागे, तरी सर्व पक्षांमध्ये अत्यंत आदरणीय कारण तुम्ही एखाद्या पदावर पोचणं महत्त्वाचं नाही तर त्या पदाला शोभेल अशाप्रकारे कायम कार्यरत राहणं महत्त्वाचं आहे (तुम्ही त्या पदावर नसतानाही)

……व्यावसायिकांना यातून एक आदर्श धडा मिळत आहे कधी आपली टीम आपल्याला
सोडून जात आहे, कधी काही पार्टनर आपल्याला सोडून जात आहे, एखादी मोठी ऑर्डर अचानक रद्द होत आहे, व्यावसायिक येणे वसूल करण्यात अडचण येत आहे वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी तुमच्या व्यावसायिक वाढीसाठी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण अशा वेळेस तुम्ही शरद पवार साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा अत्यंत उत्साहाने कार्यरत राहा. अडचणीत असलेल्या व्यवसायीकांना नेहमी मदत करा. आणि लक्षात ठेवा, संकटांचं संधीत रुपांतर करू शकतो तोच सर्वोत्कृष्ट नेता व व्यावसायिक ठरतो .

…. ग्राहकाच्या आवडीनिवडी, गरजा , बजेट नवतंत्रज्ञान , जाहिरात , मार्केटिंग याचे तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठीची प्रोफेशनल टीम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अभ्यासपूर्वक केलेले स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग तुम्हाला पुन्हा मोठ्या यशा कडे घेवून जावू शकते, पण त्यासाठी थोडी वाट पाहण्याची मनाची तयारी ठेवा. चिंताग्रस्त होऊन कधीही आपण आपलं ध्येय साध्य करू शकणार नाही.

माझ्या प्रिय शेतकरी बंधूंनो

श्री शरद पवार साहेब तर तुमचे आदरणीय नेते आहेत. किती कठीण परिस्थितीत वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी यश मिळवले आहे. त्यांचा आदर्श कायमस्वरूपी ठेवा आयुष्यात कधीच आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, तुम्ही फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही लढाईला नकार देता. तुमच्या सर्वांच्या उज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा…

 

-लेखक – संजय डागा

(सूरज इन्फो प्राइवेट लिमिटेड या नामांकित स्ट्रटेजिक कंपनीचे संचालक)

Email : [email protected]

Mobile No : 9970086000

 

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक :https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!