‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…

‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…

लातूरला माझी मायमाउली

अशीच एक आठवण लातूरच्या महाइनामी सोहळ्याचीही आहे. कार्यक्रमाला दहा हजार लोक होते. परभणीचे माणिक चव्हाण हे ‘करोडपती’ झाल्याने त्यांना असेंट हुंडाई कारचे वितरण केले. त्यावेळी प्रथमच माझी जन्मदाती, माझे सर्वस्व असलेली आई कार्यक्रमाला आली होती. तिच्यासाठी मी व्यासपीठावरच बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केली होती. प्राहुणे मंडळींचे भाषण झाल्यावर मी भाषणाला उभा राहिलो. मी नेहमीप्रमाणे सुटाबुटात होतो. तशा पेहरावात मी व्यासपीठावरच लोटांगण घेत आईला साष्टांग नमस्कार केला. ते पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. “मी आज तुमच्यासमोर ज्या व्यक्तीमुळे उभा आहे, ती माझी आई आज साक्षात या कार्यक्रमाला उपस्थित आहे!” असे मी उपस्थितांना सांगितले. सर्वच जण कौतुकाने आम्हा मायलेकाकडे पाहत होते. माझ्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू बरसत होते. माझे संपूर्ण एक-दीड तासाचे भाषण होईपर्यंत आईचे अश्रू चालूच होते. तिच्या डोळ्यातून ओघळणारा प्रत्येक थेंब तिची माझ्यावरील माया दर्शवीत होता. आजही तो प्रसंग आठवला, तरी मला गहिवरून येते. जिने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, मला संस्कार दिले, मला घडविले, ती आई आज माझे कर्तृत्व पाहायला प्रत्यक्ष उपस्थित आहे, ही भावना मला खूप आनंद देणारी होती. ‘आई’ या दोन अक्षरी शब्दाचे माहात्म्यच काही और आहे. ते व्यक्त करायला शब्दच अपुरे पडतात.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!