व्यवसायाचे बीजारोपण
पहिला विमानप्रवास
मुंबईला विमानतळावर झालेल्या प्रसंगाने माझ्यात मोठा होण्याची जिद्द तयार केली होती. पुढे मी बँकेत नोकरी करीत असतानाच बचत व विम्याचा हा साईड बिझनेस सुरू केला. भाषणेही द्यायला लागलो होतो दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास वाढत होता. भाषणे करायची कलाच माझ्यात उतरली होती. देवी सरस्वती माझ्यावर प्रसत्र झाली होती. व्यवसायांत मजा वाटू लागली. सकाळी ७.३० ते ९.३० व सायंकाळी ६.३० ते १०.३० या वेळेत औरंगाबादमध्येच छोट्या छोटया मीटिंग घेऊ लागलो. एकटाच मार्गदर्शन करायचो. शनिवारी, रविवारी तसेच बँकेच्या सुटीच्या दिवशी बाहेरगावी दौर करू लागलो. व्यवसाय वाढू लागला. तिसऱ्या वर्षी तिसऱ्या पदावर असताना मी संपूर्ण महाराष्ट्रात टॉपर ठरलो. मार्च महिन्यात माझे कमिशन व्हाऊचर निघाले. ते होते अकरा हजार रुपयांचे. तेव्हा मला बँकेत पगार होता तीन हजार रुपये महिना. म्हणजे फुलटाईम नोकरीचे तीन हजार आणि पार्ट टाईम बिझनेसचे अकरा हजार. मला प्रचंड आनंद झाला.
नंतर एका मिटिंगमध्ये मी मला मिळालेल्या पैशांची माहिती दिली. मी सांगितले, “आम्ही पाटील माणर्स. पाटलांना तसंही जास्तीचे पैसे कधी मिळत नाहीत. आणि मिळाले, तर आमचे पाटील ते पैसे फुंकून टाकतात. फुंकतात म्हणजे काय तर दारूवर फुंकतील. बिड्या, सिगारेटी फुंकतील. जुगारात फुंकतील, काही पाटील मंडळी कला केंद्रावर जाऊन टोप्या, फेटे उडवत पैसे फुंकतात. पण मी तो पाटील नाही. मला पैसे फुंकायचे; पण ते जमिनीवर नाही, तर आकाशात उडून. म्हणजे बुंगमध्ये बसून, विमानात बसून.”
माझ्या लग्नालाही तोपर्यंत चार वर्षे झाली होती. आम्हाला संदीपच्या रूपाने पुत्ररत्नही झाले होते. तो तेव्हा अकरा महिन्यांचा होता. पैसे आले होते. मी विमानातून सफर करण्याचा प्लॅन केला. बँकेकडून सुट्टी घेतली. माझ्या व्यवसायातील दीड-दोनशे लोकांना सांगून निघालो पिकनिकला फॅमिलीसह तेही विमानात बसून. पिकनिकसाठी आम्ही दक्षिण भारतात जाण्याच नियोजन केले होते. पहिले ट्रेनने फर्स्ट क्लासमध्ये बसून औरंगाबादहून हैदराबादला गेलो. दोन दिवस हैदराबाद, सिकंदराबाद, रामोजी फिल्म सिटी, गोवळकोंडा फोर्ट पाहिला. मनसोक्त भटकंती केली. आमचा विमानप्रवास १५ ऑगस्ट १९८४ ला ठरला होता. हैदराबादहून तिरुपतीला आम्ही बुंगने जाणार होतो. तशी तिकिटेही काढली होती. माझ्या सासऱ्यांचे एक नगरचे उद्योजक मित्र तेव्हा हैदराबादमध्येच वास्तव्याला होते. त्यांनी आम्हाला १४ ऑगस्टला रात्री स्वतःच्या बंगल्यावर बोलावले होते. आम्ही तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच ते आम्हाला विमानतळावर सोडणार होते. सकाळी ७.३० ला विमान सुटणार होते. त्यामुळे किमान एक तास आधी साडेसहापर्यंत आम्हाला विमानतळावर पोहचायचे होते. सकाळी टॅक्सी वगैरे मिळण्याची अडचण लक्षात घेऊन ते आम्हाला स्वतःच्या कारने विमानतळावर सोडणार होते. परंतु याच दरम्यान रात्रीतून एक अशी घटना घडली की, आम्ही विमानात बसू की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी एन. टी. रामाराव हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या हृदयावरील ऑपरेशनसाठी ते अमेरिकेला गेलेले होते. इकडे त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी आमदारांची फोडाफोड करून आंध्र प्रदेशची सत्ता ताब्यात घेतली होती. एन. टी. रामाराव चौदा ऑगस्टलाच सायंकाळी हैदराबादेत आले. ते येताच सासरा व जावांच्या समर्थकांमध्ये मोठा संघर्ष पेटला. हा वाद त्यांच्या घरापुरता राहिला नव्हता, अख्ख्या हैदराबादचे रस्ते पेटले होते. प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू केली. त्यातच चौदाला रात्रीच घोषणा झाली की, हैदराबाद येथील विमानसेवा, रेल्वेसेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहील. या बातम्यांनी आम्ही हादरूनच गेलो. माझ्या पहिल्या विमानप्रवासात राज्यातील राजकारणामुळे आडकाठी येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या पहिल्या ग्राहकाप्रमाणेच पहिल्या विमानप्रवासातही असा वेगळाच खोडा आडवा आला. पण आम्ही ठरविले, प्रयत्न करून पाहायचा. विमानतळावर तर जाऊ. म्हणून पहाटेच आम्ही कसेबसे विमानतळावर पोहचलो. तिथे एक घोषणा झाली. सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. परंतु तिरुपतीला जाणारे एक विमान मार्गस्थ होणार आहे. याचे कारण म्हणजे त्या विमानाने अनेक बड़े अधिकारी जाणार होते. त्यांच्यासाठी अपवाद महणून विमान सोडण्यात येणार आहे. आमच्या सुदैवाने आमचे तिकीट त्याच विमानाचे होते. त्यामुळे आमचाही तिरुपतीला जाण्याचा मार्ग मोकल्य झाल्या. खूप हायसे वाटले. आम्ही सर्व सोपस्कार पार पडले व शिडीने ऐटीत विमानात जाऊन बसलो.
विमानप्रवासाचा बेत आखताना आम्हा उभयतांचे विमानात विडो सीटवर कोण बसणार यावरून वाद झाले होते. सुदैवाने आमच्या विमानात सगळे मिळून फक्त मेरा ते मौदा लोक होते. त्यामुळे विडो सीटवर कोण बसणार, हा प्रश्न संयुहात आत्या, स्थानापन्न झाल्यावर काही वेळातच आमचे बुंग हवेत झेपावले. खूप मजा आली. खिडकीतून आम्ही जमीन पाहत होतो. संपूर्ण आंध्र प्रदेशात त्या वेळी तणावाची परिस्थिती होती. आमचे सहप्रवासीही जरा तणावातच होते. पण आमचा पहिलाच विमानप्रवास असल्याने आमच्या चेहऱ्यावर आनंद इळकत होता. ते पाहून त्या प्रवाशांनाही जरा वेगळेच वाटत असेल. त्यांना आमच्या आनंदाचे कारण कळले नसेल, आम्हीही त्यांच्याकड दुर्लक्षच केले. आपण बुंगमध्ये बसून हवेत उडतोय, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे होते. तसा हा विमानप्रवास पंचेचाळीस मिनिटांत आटोपला. आमचे चुंग तिरुपतीला व्यवस्थित उतरले. विमानप्रवाशांना त्या काली हीआयपी ट्रिटमेंट मिल्लायची, त्यांना मंदिरात नेण्यासाठी स्वतंत्र बस असायची. दर्शनही घेट मिळायचे. याशिवाय मुक्कामासाठी चार रूमचा स्वतंत्र ब्लॉक मिळायचा. आम्ही तिरुपती बालाजीचे व्यवस्थित दर्शन घेतले.
तिसऱ्या दिवशी आम्ही तिरुपतीहून फर्स्ट क्लास ट्रेनने मद्रासला (आताचे चेत्रई) जाणार होतो. पण तिथेही तणावाची परिस्थिती होतीच. आता ट्रेन मिळेल का? मिळाली तरी ती सुटणार का? असे अनेक प्रश्न होते. पण विमानासारखेच आम्ही नियोजित वेळी रेल्वे स्थानकावर जाण्याचे ठरविले. योगायोगाने आम्ही ज्या ट्रेनचे बुकिंग केले होते, ती नियोजित वेळेनुसार मद्रासकडे जाणार होती. आता फक्त आम्ही तिथे पोहचायचा प्रश्न होता. कारण टॅक्सीसेवा बंद होती. बरेच प्रयत्न केल्यावर एक ऑटो रिक्षावाला पाचपट पैसे घेऊन आम्हाला रेल्वेस्टेशनवर सोडायला तयार झाला. आम्ही पोहचेपर्यंत ट्रेन निघण्याच्या बेतात होती. मी पत्नी व मुलाला घेऊन अक्षरशः पळतच ट्रेन गाठली. फर्स्ट क्लासचा डबा पकडायची संधी मिळाली नाही. आम्ही आपले जनरल डब्यात पोहचलो. त्यात इतकी गर्दी होती की, पाय ठेवायलाही जागा नव्हती. कसेबसे आम्ही स्वतःला त्या डब्यात कोंबले. तिरुपती ते मद्रास हा प्रवास आम्ही अक्षरशः ट्रेनमधील संडासाच्या दारात उभा राहून केला. मद्रासला गेल्यावर मात्र सगळा शिणवटा घालविला. दोन दिवस मनसोक्त फिरलो. तिथून बेंगलोरला पुन्हा बुंगनेच प्रवास केला. बेंगलोर, मौसूर, उटी अशी सफर करून बेंगलोरहून परत पुण्यापर्यंत विमानानेच आलो.
पुण्यातही एक दिवस थांबून पुणे दर्शनच्या बसने संपूर्ण पुणे शहरातील प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळे पाहिली. पुण्यावरून मग एशियाड बसने औरंगाबादला घरी परतलो. असा हा आमचा पहिला विमानप्रवास. आंध्रातील तणावाचे वातावरण वगळता बाकीची संपर्ण सहल मनसोक्त उपभोगली. विमानात बसल्यावर राहून राहून मुंबईत माझी औकात काढणारा तो इसम डोळ्यासमोर येत होता. त्याचे ते हिणवणारे वाक्य ऐकू येत होते. त्यावेळी तो अपरिचित इसम जे बोलला, त्यानेच माझ्या मनात विमानप्रवासाची आग लावली होती. शेळी उंटाचा मुका घेऊ शकते, हे मी दाखवून दिले. तेव्हा मी मनाशी म्हणालो होतो, ‘ये भी दिन जायेंगे.’ मनातील ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी झटून काम केले. चाकोरीच्या बाहेर जाऊन धाडस केले. अपमानाच्या प्रसंगातून नाउमेद व्हायचे नसते, तर पेटून उठायचे असते. अपमान करणाऱ्याला बोलण्यापेक्षा कृतीतून उत्तर दिले पाहिजे. मी माझ्या भाषणात नेहमी सांगत असतो, “मी दहा दिवसांत अकरा हजार रुपये हवेत बुंगमध्ये बसण्यासाठी फुंकले. पण त्यामुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वृद्धिंगत झाला. अगदी सातव्या आसमानवर पोहचला. या जोरावर मी पुढील काळात अफलातून व्यवसाय करू शकलो. यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करीत अटकेपार झेंडे रोवू शकलो.” वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत साध्या एस.टी. च्या बसमध्येही न बसलेला मी व्यवसायात उतरल्यानंतर पुढील पंचवीस वर्षांत अर्धे जग फिरू शकलो, याचा मला मनस्वी आनंद वाटतो.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
