स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल
बहाणेबाजी टाळा
काही लोक सातत्याने बहाणेबाजी करत असतात… ‘मला चांगले शिक्षण मिळाले नाही, माझी आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे, लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी पडली, अपघातात मी अपंग झालो, माझे नशीबच खराब होते, मी मंद बुद्धीचा आहे, मी लहान किंवा बुटका आहे, मी खूप उंच आहे, माझ्याकडे भांडवलच नाही…. अशी रडकथा ऐकवून अनेक जण अपयशासाठी कारणे देत असतात… पण खरेच यशाच्या आड अशा गोष्टी येतात का? मला वाटते, अजिबात येत नाही… तुम्ही पुढील दिलेली उदाहरणे वाचा… तुम्हीसुद्धा म्हणाल, बहाणेबाजी नको…
- वसंतदादा पाटील फक्त चौथी इयत्ता शिकेलेले वसंतदादा पाटील तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, अनेक राज्यांमध्ये राज्यपालपदही त्यांनी भूषविले, आज महाराष्ट्रात खासगी मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेजे मुबलक प्रमाणात आहेत. या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे कामही वसंतदादा पाटील यांनीच मुख्यमंत्री असताना केले. राज्यपाल म्हणून संबंधित राज्यातील विद्यापीठे, शिक्षणविभागाचे प्रमुख म्हणून कुलपतीही होते. त्यांच्या या वाटचालीत कधीही त्यांचे शिक्षण आडवे आले नाही.
- लता मंगेशकर कौटुंबिक जबाबदारी तसेच अन्य कारणांनी लतादीदींना वयाच्या नवव्या वर्षीच शाळा सोडावी लागली, व्यावसायिक गायनाकडे त्यांना वळावे लागले. खरे तर इतक्या कमी वयात मोठी जबाबदारी आल्यावर दुसरा कोणी हतबल झाला असता, पण लतादीदींनी गायनात इतिहास रचला. गानकोकिळा, गानसम्राज्ञी म्हणून मान मिळविला. भारतरत्न किताबाच्याही त्या मानकरी ठरल्या. आयुष्याची सुरुवात खडतर झाली असली, तरी त्यांनी परिस्थितीवर आपल्या कलेतून मात केली.
- सुधा चंद्रन प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून परिचित असलेल्या सुधा चंद्रन यांना अपघाताने अपंगत्व आले. पण त्यांनी कर्तृत्वाने अपंगत्वावर मात केली. कृत्रिम पाय बसवून त्या पुन्हा नृत्याकडे वळल्या. त्याच जिद्दीने त्यांनी आपली कला पुन्हा फुलवली. त्यांच्याच जीवनावर आधारित ‘नाचे मयूरी’ हा सिनेमा आपणाला माहितीच असेल. विशेष म्हणजे यात त्यांनीच मध्यवर्ती भूमिकाही केली.
- अमिताभ बच्चन: दिवाळखोर झाल्यानंतरही तितक्याच जोमाने बाउन्स बँक कसे होता येते, याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन, एबीसीएल कंपनी काढून व्यवसाय करण्याचा बिग बीचा प्रयत्न साफ फसला. अक्षरशः सर्वस्व गमावण्याची वेळ आली. परंतु त्यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे छोट्या पडद्यावर पदार्पण करण्याचा. एबीसीएलमुळे मिळालेले अपयश केबीसीने धुवून काढले. बिग बी पुन्हा दिमाखात उभे राहिले. उंची व आवाजामुळे फिल्म इंडस्ट्रीने सुरुवातीला नाकारले होते. पण याच गोष्टीतून त्यांनी प्रचंड यश मिळविले. झिरो टू हिरो, हिरो टू झिरो आणि पुन्हा हिरो असा हा त्यांचा प्रवास कारणे देत बसणाऱ्यांसाठी दिशादर्शक आहे.
- थॉमस अल्वा एडिसन एडिसन लहान असताना अक्षरशः मंदबुद्धी होता. शाळेत त्याला काहीच येत नसल्याने शिक्षकांनी त्याला कानाखाली लावली. यामुळे एडिसनला बहिरेपण आले. त्याला शाळेतूनही काढून टाकण्यात आले. परंतु त्याच्या आईने त्याला शिकविले. पुढे जाऊन याच एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावण्याची थक्क करणारी कामगिरी केली. मंदबुद्धीवाल्याने इतिहास घडविला. त्यामुळे ‘मला बुद्धी नाही’ असे म्हणणाऱ्यांनी आधी एडिसनचे चरित्र अभ्यासले पाहिजे.
- नारायण मूर्ती: ‘माझ्याकडे धंदा करायला भांडवलच नाही,’ असे रडणाऱ्यांसाठी नारायण मूर्ती आदर्श आहेत. मूर्तीनी आपल्या पत्नीकडील स्त्री-धन गहाण ठेवून ‘इन्फोसिस’ या आय. टी. कंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी फॉर्च्यून ५०० मध्ये नोंदली गेलेली आहे. इन्फोसिसची २०२०-२१ उलाढाल १० हजार कोटींची आहे. जगातील यशस्वी कंपनी म्हणून इन्फोसिसचा दवदवा आहे.
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती राहिलेले डॉ. कलाम यांचा जन्म सर्वसामान्य गरीब कुटुंबात झाला. पण त्यांचे कर्तृत्व गरिबीचे रडगाणे गाणाऱ्यांसाठी चपराक आहे. दोन वेळच्या जेवणासी प्रांत असलेले कलाम सायकलवरून पेपर टाकण्याचे काम करायचे. ‘कमवा व शिका’ योजनेतून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे जाऊन ते भारताचे थोर शास्त्रज्ञ तसेच नंतर राष्ट्रपतीही झाले.
- नरेंद्र मोदी: रेल्वेस्थानकावर चहा विकून गुजराण करणारे मोदी कष्ट, जिद्द, परिश्रम आणि ध्येयनिष्ठा या जोरावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान झाले. आजही त्यांच्या भाषांसाठी लाखोंची गर्दी होते. सर्व भारतीयांना ते आपल्यातीलच एक वाटतात. देशासाठी सर्वस्व झोकून देत काम करण्याची त्यांची विलक्षण हातोटी थक्क करणारी आहे.
- करसनभाई पटेल गरीब कुटुंबात जन्मलेल्या करसनभाई पटेल यांनी बीएस्सीचे शिक्षण घेतल्यानंतर खासगी कंपनीत नोकरी केली. नंतर ते सरकारी नोकरीतही रुजू झाले. पण काही तरी वेगळे करण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने त्यांनी नोकरी सांभाळून आपल्या दहा बाय दहाच्या खोलीत कपडे धुण्याची पावडर तयार केली. १९८० च्या दशकात परदेशी कंपनीची पावडर १० रुपये किलो असताना पटेल यांनी आपली पावडर ३ रुपये किलो दराने सायकलवर जाऊन घरोघरी विकली. गुणवत्तेमुळे अवघ्या काही वर्षांतच पटेल यांची ‘निरमा’ पावडर भारताच्या घराघरांत पोहचली. निरमा ब्रँड निर्माण झाला. सायकलवर पावडर विकणारे पटेल आज स्वतःच्या मालकीचे विमान बाळगून आहेत.
- उंची कर्तृत्वाची सचिन तेंडुलकर तुलनेने बुटका आहे, तर अमिताभ बच्चन अधिक उंच आहे. परंतु शारीरिक उंचीचा त्यांच्या यशोमार्गात काहीच अडसर आला नाही. दोघांनीही कर्तृत्वाची वेगळीच उंची गाठली.
- अब्राहम लिंकन ‘नशीबच खराब आहे,’ असे म्हणणाऱ्यांनी अब्राहम लिंकन यांचे चरित्र वाचावे. आमपंचायत निवडणुकीतही यश मिळवू न शकलेले अब्राहम लिंकन थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आले.
- हेनरी फोर्ड १८६३ ला जन्मलेल्या हेन्री फोर्ड यांनी १९०१ ला जगातील पहिली कार बनविली. सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून त्यांनी कमी किमतीत कार बनविली. इंजिनासाठी आठ सिलेंडर एकाच जागी बसवून चमत्कार केला. सुरुवातीला कारमध्ये रिव्हर्स गियर बसवायचा त्यांना विसर पडला. पण नंतर त्यांनी त्यात दुरुस्ती करीत परिपूर्ण कार बनविली.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
