स्वतःला ओळखा…जग तुम्हाला ओळखेल

३. स्वतःला ओळखा…जग तुम्हाला ओळखेल

 

तुम्ही गरीब किंवा श्रीमंत असा, शिक्षित असा वा नसा, तुमचे वय, रंग, रूप कसेही असू द्या. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्यानंतर जग तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार नाही ३५ व्या वर्षी मल समजलं माझा जन्म नोकरीसाठी नसून नोकऱ्या देण्यासाठी आहे. मी स्टेट बँकेतील नोकरी सोडून उद्योजक झालो. नवव्या वर्षी लता मंगेशकरांना कळाले त्या भारतरत्न गानकोकिळा झाल्या. दहावी नापास झालेल्या सचिन तेंडुलकरला कळले की त्याचा जन्म क्रिकेटसाठी झाला. त्यामुळे १०० शतके ठोकून तो क्रिकेटचा देव झाला. ४०व्या वर्षी लाकूडतोड्या अब्राहम लिंकनला कळाले ते ५७ व्या वर्षी राष्ट्रपती झाले. बस कंडक्टर असलेला शिवाजी गायकवाड फिल्मस्टार रजनीकांत झाला. एक साधी शिक्षिका असलेल्या मा टेरेसा त्या गेल्यावरही त्यांची मिशनरी रोज ४० लाख लोकांना मोफत जेवण देते. एक साधे वकील मोहनदास करमचंद गांधी यांना आफ्रिकेत रेल्वेतून ढकलले ते राष्ट्रपिता महात्मा गांधी झाले. बेटर असलेला अक्षयकुमार फिल्म स्टार झाला. स्कूल ड्रॉप झालेल्या स्टीव्ह जॉब्सने जागतिक डिजिटल क्रांती केली. तर साधा चहा विकणारा मुलगा भारताचा दोनदा पंतप्रधान झाला. यांनी प्रथम स्वतःला ओळखून स्वतःबरोबर जगालाही बदलविले. तु करतो

आपण खूप भाग्यवान आहोत कारण परमेश्वराने आपल्याला सर्वात तीक्ष्ण बुध्दी व वाचा असलेल्या माणसाचा जन्म दिला. स्वतःला कमी लेखू नका, स्वतःची ताकद ओळखा जग निश्चित तुम्हाला ओळखेल.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

 

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:                                    https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!