नियोजन हा शब्द इतका परवलीचा किंवा आपल्या सर्वांच्या परीचयाचा असतो की त्यामुळे आपण त्याच्या अर्थाकडे पाहण्याची शक्यतो तसदीच घेऊ इच्छीत नाही. बऱ्याच लोकांना विचारुन पहा. नियोजन म्हणजे काय ? तर ९५% लोकांना याचे उत्तर देता येणार नाही आणि ज्या ५% लोकांना याचे उत्तर माहित आहे त्यातील आणखी फक्त ५% लोकच यशस्वी झालेले दिसतात. कारण नुसते नियोजन म्हणजे काय हे सांगून भागत नाही तर ते अंमलात आणले तरच त्याचा उपयोग स्वप्नात वाघ मारला म्हणून कोणी शूर होत नाही किंवा स्वप्नात विमानात बसले म्हणून कोणी उड्डाण करीत नाही तसेच नियोजन हा शब्द अंमलबजावणी शिवाय व्यर्थ ठरतो. तर आता पाहाच नियोजन म्हणजे नक्की काय आणि ते कसे केले जाते.
नियोजन म्हणजे अशी तयारी जी आपल्याला व्यवस्थीत मार्गदर्शन करते की आपण कोठे जायचे आहे आणि कसे जायचे आहे याची सुरुवात होते ती आपण कोठे आहोत येथून. म्हणजेच काय तर नियोजन म्हणजे एक अशी कृती जी एका पुलाप्रमाणे आहे जी दोन गोष्टी जोडते एक तुम्ही कोठे आहात आणि दुसरे म्हणजे तुम्ही कोठे जाणार आहात.
नियोजनाची काही मान्यवरांनी केलेल्या व्याख्या पहा. हेच सांगतात Planning is deciding in advance what to do, how to do, when to do and who is to do it Koontz and O. Donnell
या व्याख्येचा साधा अर्थ असा की आपण अगोदरच याचा निर्णय घ्यायचा की ते विशिष्ट कोणते काम करायचे आहे, कसे करायचे आहे, कधी करायचे आहे आणि ते कोण करणार आहे.
थोडक्यात काय तर काम ठरवायचे, ते काम कोणी करायचे, कसे करायचे आणि कधी करायचे हे Advance मध्ये ठरविणे म्हणजेच नियोजन. नियोजनाची आणखी एक प्रसिद्ध व्याख्या पहा.
Planning is the process of establishing goals and a suitable course of action for achieving these goals. – James stoner
नियोजन म्हणजे काय तर आपले ध्येय ठरविण्याची एक प्रक्रिया आणि ते ध्येय साध्य करण्याचे मार्ग ठरविणे अर्थात suitable मार्ग. नियोजन केल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपले ध्येय ठरविता येते म्हणजे कोणत्या गावाला जायचे आहे
याचा निर्णय होतो आणि मग आपोआपची पुढची पायरी येते की कोणी जायचे, कसे जायचे आणि केव्हा जायचे. उदा. पुणे येथे जायचे मग कोण जाणार ती व्यक्ती निवडा. मग कसे जायचे बस, रेल्वे, विमान की खाजगी वाहन आणि मग हेही ठरवायचे की केव्हा निघायचे अर्थात हे सगळे ठरविल्यानंतर गाडी चुकणार नाही आणि बाकीचे पश्चाताप करण्याची वेळच येत नाही. कारण नियोजन केल्यामुळे कोणती गाडी कुठे, किती वाजता येते हे ही तुम्ही लक्षात घेऊनच बाहेर पडत असता. ही प्रक्रिया जरी वाटायला सोपी तरी चालायला अवघड ठरते. कारण यातला एक जरी घटक इकडे तिकडे झाला तर सगळी मेहनत गेली पाण्यात. आणि तसे होऊ नये म्हणून काय दक्षता घ्याव्यात ते पाहूया. चांगला Plan नियोजन कशाला म्हणतात ते पाहूया. Essentials of a good plan. म्हणजे नियोजन करताना घ्यावयाच्या दक्षता.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
