५.स्वयंशिस्त : Self Discipline
तंग उंचच उंच आकाशात उडतो तो त्याच्या दोर मांजामुळेच ! पतंग जर तुटला तर तो दोर तो पतंग न राहता फाटलेला कागद बनतो. यशस्वी जीवन म्हणजे एक पतंगच आहे व स्वयंशिस्त म्हणजे दोर आहे. तो जर तुटला तर तुम्ही बेशिस्तपणे वागाल. त्यामुळे तुमचे जीवन बरबाद झालेच म्हणून समजा. मग तुमच्याकडे कितीही संपत्ती, ज्ञान, कौशल्य व कष्ट करण्याची तयारी असली तरीही जीवनाचे वाटोळेच होते हा सिद्धांत सांगतो.
जर तुम्हाला आळस किंवा थकवा येत असेल, ध्यान लागत नसेल, बोअर होत असेल, अपयशाची भीती वाटत असेल किंवा सूर्योदयापूर्वी उठण्यासाठी अलार्म लागत असेल तर तुमच्या पतंगाचा दोर तुटला आहे असे समजा. ९० टक्के लोकांचा दोर तुटलेलाच असतो. म्हणून ते जीवनात बेशिस्तीनेच वागतात व फेल होतात. कारण त्यांचा त्यांच्या मनावर व शरीरावर ताबा नसतो. म्हणून तुम्ही कोणतीही किंमत मोजा पण सूर्योदयापूर्वी उठण्याची, दिलेली वेळ पाळण्याची, खाण्यापिण्याची व आपल्या कामाची स्वयंशिस्त लावा व तुमच्या यशाचा पतंग उंच उंच यशोशिखरावर डौलाने फडकवा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा: https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
