नियोजनाचे फायदे

नियोजनाचे फायदे

आपण कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक केली तरच ती प्राप्त होते, ध्येये सिद्ध होऊ शकतात आणि त्याचे अनेक फायदे आपणाला होत असतात. हे फायद कोणकोणते असू शकतात ते पाहूया.

१. Minimise Risk: धोका कमीत कमी होतो

चांगलं नियोजन केल्यामुळे धोका कमी होतो किंवा नष्ट होतो कारण पुढे काय काय अडथळा येऊ शकतो काय धोका निर्माण होऊ शकतो याचा अगोदरच अंदाज बांधून तसं त्या धोक्याला सामोरे जाण्याची तयारी केलेली असते किंवा तो संभवित धोका टाळण्याचे नियोजन केलेले असते आणि शेवटचा पर्याय म्हणजे धोका टाळण्याचा प्रयत्न करुनही जर मार्गात धोका आलाच तर मग बचावात्मक यंत्रणा कोणती असेल ती कशी वापरली जाईल याचेही नियोजन केलं जातं. आणि ती परिस्थीती सांभाळण्यासाठी आपण मानसिकरीत्या तयारीत असतो. महाराजांचा लाल महालावरील छापा, पन्हाळ्यातून सुटका, आग्र्यातून सर्वांसहीत सहीसलामत सुटका ही ज्वलंत उदाहरणे आपल्याला पहायला मिळालीच आहेत.

२. Facilitate co-ordination समन्वयाची सोय होते

नियोजन केल्यामुळे त्यात सहभागी असणाऱ्या लोकांचा आपआपसात ताळमेळ राखला जाईल अशी व्यवस्था निर्माण केली जाते. त्यामुळे सहाजिकच एकोप्याची भावना निर्माण होते. जेवढा चांगला समन्वय तेवढी जास्त यशस्वी होण्याची हमी.

३. Facilitate organising : साधनांची जुळवाजुळव करण्यात मदत होते.

नियोजन करणाऱ्या व्यक्तीला नियोजनाचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की त्याला आपले अंथरुण किती आणी पांघरुण किती हे ठरविता येते आणि गरजेनुसार अंथरुण मोठे करता येते किंवा पांघरुण वाढविता आणि हे शक्य नसेल तर किमान हातपाय किती आखडून घ्यायचे हे तरी ठरविता येते त्यामुळे ठरलेलं ध्येय त्या व्यक्तीला साध्य करण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधन सामग्री जुळवण्याची प्रेरणा देते आणी त्यानुसार माणूस कामाला लागते आणि मग काम झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी पहिल्यांदा सुरतेला जाताना १०,००० मावळे सोबत घेतले तर दुसऱ्या वेळी मोगलांची तयारील घेऊन १५,००० मावळे सोबत घेतले. अफजलखान भेटीला जाताना बिचवा वाधनखांचा वापर करणं महाराजांना याच तत्वामुळे शक्य झाले. ही मराठा युद्धपद्धत नियोजनानुसार समन्वय घडवून हमखास यश देणारी अशी पढ होती. महाराजांचा गनिमी का

४. Facilitate Direction: योग्य दिशा मिळते

चांगले नियोजन माणसाला योग्य दिशा देण्यास सक्षम ठरते. नियोजनामु आपल्याला योग्य वेळापत्रक हाती मिळते आणि त्यानुसार कामाचे नियोजन करता येते

4. Facilitate Control : नियंत्रण करता येते

नियोजन केल्याचा एक प्रमुख फायदा असा असतो की आपण काय कमवायचे किंवा प्राप्त करायचे आहे हे निश्चित केलेले असते आणी त्यानुसार आपण अंमलबजावणी करताना काही मापदंड ठरविलेले असतात त्याच्या अनुषंगाने आपला परफॉर्मन्स, प्रगतीचा आलेख तपासता येतो आणि काही कमतरता आढळत असेल तर त्याप्रमाणे नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यान्चीत करता येते. उदा. एखादा विद्यार्थी परीक्षेत एवढे % मिळाले पाहिजेत असे नियोजन करुन जेव्हा परिक्षा देतो तेव्हा त्याला लक्षात येते की ही टक्केवारी गाठण्यासाठी कोणता विषय कमी पडतो आहे आणि त्यानुसार त्याला त्या विषयाची तयारी करुन नियोजीत ध्येय गाठता येते.

६. Generates efficience कार्यक्षमता निर्माण होते

नियोजन केल्यामुळे आपल्याकडे असलेल्या सर्व साधन सामग्रीची जुळवाजुळव करुन त्याचा सगळ्यात चांगला वापर करता येतो. आपण याला Optimum utilisation of Resource म्हणतो. म्हणजेच काय तर नियोजन केल्याचा हा प्रमुख फायदा आहे की आपण आपली सर्व साधने मग ती मनुष्यबळ मशीन पैसा असो की इतर काही या सर्वांना Best use करु शकतो. आणि याचा फायदा म्हणजे आपण जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतो आणि तोही कमीत कमी किंमतीत. Lowest possible cost and highest possible returns.

७. Encourages Innovation : नवीन कल्पनेला वाव मिळतो नियोजन करण्याची प्रक्रिया आपल्याच नवीन विचार करायला शिकवते आपण

ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी व्यवस्थापकाला नव-नवीन कल्पना शोधाव्या लागतात. नवनवीन युक्त्त्या योजाव्या लागतात आणि त्यामुळे बुद्धीला चालना मिळते. प्रत्येक नियोजन ही एक नवीन कल्पनाच असते जी अस्तीत्वात उतरविण्यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागतो. अर्थात नियोजन काय हे बुद्धीशिवाय कल्पना करणे तरी शक्य आहे का ? महाराजांच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि या युक्तीला २ जन्म देते ते नियोजन. प्रत्येक नवीन योजना म्हटलं की नवीन युक्ती आलीच. नियोजनाशिवाय युक्ती आणि युक्तीशिवाय नियोजन ते कसले ?

L. Focus on Goals: ध्येयावर प्रकाशझोत ठेवता येतो

नियोजन केल्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपल्या लक्षावर ध्येयावरच लक्ष केंद्रीत करता येते. नियोजन ही अशी कृती आहे जी आपल्याला ठरलेल्या मार्गावरुन इकडे तिकडे भटकू देत नाही आणि त्यामुळे आपण सरळ ध्येयाच्या दिशेने चालत जाऊन योग्य ठिकाणी पोहचतो. नियोजनामुळे आपल्या प्रत्येक कृतीला दिशा दिली जाते आणि त्यावर नियंत्रणही ठेवले जाते. त्यामुळे सहाजिकच आपले ध्येय नेहमी आपल्या डोळ्यासमोर, प्रकाश झोतात ठेवता येते. काचेच भिंग पहा. आपण जेव्हा सूर्य प्रकाश एका ठिकाणी एखाद्या कागदावर केंद्रीत करतो त्यावेळी काही मिनीटांत आपल्याला निकाल मिळतो. कागद जळताना दिसतो. कारण एकच आपण त्या एकाच ध्येयावर focus करुन काम करतो. शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडून निश्चित मार्गाने, निश्चित दिशेने निश्चित वेळेत राजगडावर पोहचले आणि ते ही २४ दिवसांत, तेही पावसाळ्याच्या दिवसात, यमुना आणि इतर सर्व नद्यांना पूर आलेला असताना, पडत्या पावसात, कमरे इतक्या चिखलातून महाराजांनी राजगडावर पोहचणे तेही संपूर्ण शत्रूचा मुलुख पायाखाली तुडवत आणि २६०,००० पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या सैनिकांना, गुप्तहेरांना चुकवत कारण एकच focus on goal आग्र्यातून सुटायचे आणि सहीसलामत राजगडावर पोहोचायचे तेही एकही माणूस मागे न सोडता शत्रूच्या तावडीत सापडू न देता यालाच म्हणतात ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन ते प्राप्त करणे.

९. Facilitate Decision making: योग्य निर्णय घेता येतो

नियोजन केल्याचा आपणाला जो फायदा होतो तो म्हणजे आपणाला योग्य निर्णय घेता येतो. आपण नियोजन करतो त्यावेळी एक ध्येय प्राप्त करायला एकच योजना बनवत नसतो तर आपण Alternative म्हणजे पर्यायी दोन-तीन-चार Plan बनवितो. त्यातील सर्वात योग्य Plan कोणता ते आपण ठरवितो आणि त्यानुसा पर्यायी Plan पैकी योग्य पर्याय माणसाला निवडता येतो म्हणजेच योग्य निर्णय घेता पर्यायी या निर्णयानुसार आपणाला साधनांची जुळवाजुळव करता येते. कामाला दिशा देता येते आणि कामावर नियंत्रणही ठेवता येते.

देता येला नी आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी अशा तीन योजना एकाच वेळी बनविल्यास एक म्हणजे पेटाऱ्यातून जाणे, दुसरे म्हणजे पेटाऱ्याचे भोई म्हणून बाहेर बनणे आणि तिसरी योजना म्हणजे वेशांतर करुन बाहेर पडणे. यातील सर्वात सक्षम आणि सुरक्षित असा जो तिसरा पर्याय होता तोच महाराजांनी निवडला आणि २४ दिवसात पडत्या पावसात महाराज हजारो किलोमीटर अंतर कापून राजगडावर दाखल झाले. म्हणजेच काय तर महाराजांनी योग्य निर्णय घेतला.

१०. Motivates personnel: सहकाऱ्यांना प्रेरणा मिळते

जेव्हा एक कुशल किंवा प्रोफेशनल व्यवस्थापक नियोजन करायचा विचार करतो तेव्हा तो आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतो. त्या प्रक्रियेत त्या सर्वांना सामावून घेऊन त्यांच्या विचारांना, कल्पनांना वाव देतो आणि त्यामुळे त्यांची त्या कामातील बांधीलकी वाढते आणि ते आपुलकीने ते ध्येय गाठण्यासाठी प्रेरीत होतात शिवाय एक नवीन ध्येय जे त्यांना प्राप्त करण्यासाठी सांगितले जाते ते आव्हानात्मक असेल तर नक्कीच ते प्राप्त करण्यासाठी एक प्रेरणादायी काम ठरत असतं. कारण आव्हानात्मक काम करायची संधी सगळ्यांनाच मिळत नसते आणि ही दुर्मीळ संधी ज्यांना मिळते ते नक्कीच या ध्येयाला अत्यंत उत्कृष्टपणे प्राप्त करुन आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी प्रेरीत होऊन आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करायला प्रवृत्त होतात.

नियोजनाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे आव्हानात्मक ध्येय आव्हानात्मक लोकांना साद देते आणि हे प्रेरीत लोक कोणत्याही परिस्थितीत वाटेल ती किंमत मोजून ते ध्येय प्राप्त करतातच.

आतापर्यंत आपण नियोजन म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय होतात ते पाहिले. परंतु हे नियोजन कसे केले जाते हे पाहणे गरजेचे आहे. कारण नियत जते करण्याची प्रक्रियाच माहीत नसेल तर नियोजनाचे फायदे आपणाला कशातून आणि कसे मिळतील. थोडक्यात काय तर मासे खायला शिकवण्याअगोदर मासे पकडायला शिकविले पाहिजे. एकदा का मासे पकडायची रिती पद्धती माणसाला माहीत करुन दिली तर तो उपाशी मरु शकत नाही. कारण मिळालेले मासे भाजून, उकडून, तळून किंवा मसालेदार बनवून कसेही खाऊ शकतो. पण मासेच पकडायचे माहीत नसेल तर पुढची सगळी स्वप्ने मातीत ना !

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

 

error: Content is protected !!