१०. स्वतःचे विक्रम मोडीत चला

१०. स्वतःचे विक्रम मोडीत चला

शिवबाराजे तुमची दुसऱ्या कोणाशी स्पर्धा करण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येकाने आपआपले ध्येय ठरवावे आणि स्वतःचे विक्रम स्वतःच मोडीत काढत नवनवे विक्रम रचत गेले पाहिजे. इतरांशी तुलना करणे किंवा स्पर्धा करणे हे काही योग्य माणसाचे योग्य काम नव्हे. जगातील प्रत्येक माणूस हा विशेष असाच असतो. Unique असतो. तो प्रत्येकापेक्षा सर्वच बाबतीत वेगळा असतो. तेव्हा एका माणसाने दुसऱ्या माणसाशी स्पर्धा करण्यापेक्षा त्या माणसाने आपल्या स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे.

या जगात तुम्हाला जिंकून देणारे पण तुम्ही स्वतःच असता आणि हरवणारे पण स्वतःच. कारण माणसाचे ८०% यश हे स्वतःवर अवलंबून असते तर केवळ २०% तो यशासाठी बाहेरील परिस्थितीवर अवलंबून असतो. तेव्हा ज्याला ज्याला यशस्वी व्हायचे त्याने या ८०% आपल्या आतमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि जर क्षमतावर, गुणांवर लक्ष दिले नाही आणि बाहेरच स्पर्धा करायला गेला तर मग या ८०% क्षमताच त्याच्या कमजोरीमध्ये परावर्तीत होतात. तेव्हा सर्वप्रथम माणसाने आपणाला आवडणाऱ्या किंवा आपल्यामध्ये उपजत असणाऱ्या कलागुणांना न्याय द्यायला शिकलं पाहिजे. आणि मग या कलागुणांचा विकास करत करत नवनवी धोरणे आखत नवनवीन ध्येयप्राप्तीचे टप्पे ठरविले पाहिजेत आणि ते प्राप्त केले पाहिजेत. अगोदरची ध्येयप्राप्ती ही बेसलाईन किंवा बेसपॉईंट पकडून त्याआधारे पुढील आणखी उंचीचे किंवा आणखी मोठे असे ध्येय ठरवावे आणि ते प्राप्त करावे

या प्रक्रियेलाच आपण सिमोल्लंघन असे म्हणूया. दरवर्षी दसरा झाला की सोने लुटायचे आणि आपला प्रवास सुरू करायचा. दरवर्षी मोठमोठ्या
मोहिमा आणि छापे घालायचे. प्रत्येक वर्षी एक नवीनच विक्रम प्रस्थापित झाला पाहिजे आणि दुसऱ्या कृतीने पहिल्या कृतीचा विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक प्रस्थापित केला पाहिजे. यामुळे सतत आपणामध्ये अभ्यासाची, सरावाची, नवीन गोष्टी शिकण्याची उमेद राहते आणि आपणाला मोठ्यात मोठे यश मिळविता येते.

लक्षात ठेवा “जो शिकेल तो टिकेल आणि जो जास्त शिकेल तोच जिंकेल.” तेव्हा स्वतःचे विक्रम स्वतः मोडीत काढायचे असतील तर सतत नवनवीन गोष्टी शिकायची तयारी ठेवा. मागील चुका दुरुस्त करा आणि मागील अनुभव पाठिशी घेत तेच काम आणखी वेगाने आणि अचूकतेने करा. हीच यशाची खरी गुरुकिल्ली पाहिजे. शहाणा माणूस तर आपल्या हातून झालेल्या चुकांमधून पण शिकतो. चलता है, चालतं असं, कधी कधी होत असतं असं म्हणून ती चूक झाकण्याची तो अजिबात चूक करत नाही. झालेली चूक प्रांजळपणे कबूल करायची आणि मोठ्या समजूतदाराप्रमाणे ती दुरूस्त करून पुढे नवनवीन विक्रम रचायची तयारी करायची तो मानसिकता ठेवतो. 10

राजे आपणही आपल्या आयुष्यात हा गुण धारण करावा आणि रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत जगातील सर्वात यशस्वी गुणवंत व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा. राजमाता जिजाऊ यांच्या या शिकवणीप्रमाणे महाराजांनी अनेक बाबतीत विक्रम रचले त्यातील काही उदाहरणे पाहू. जुन्नरला टाकलेला छापा त्यापेक्षा मोठा छापा जावळीवर टाकला. जावळीपेक्षा मोठा छापा सुरतेवर टाकला. पुरंदरच्या पहिल्या युद्धापेक्षा मोठे असे प्रतापगडचे युद्ध जिंकले. प्रतापगडापेक्षा मोठे युद्ध उंबरखिंडीत जिंकले. उंबरखिंडीपेक्षा मोठे युद्ध साल्हेरचे युद्ध जिंकले. ८० हजार मोगलांचा ४० हजार मराठ्यांनी उघड्यशा मैदानात प्रचंडं मोठा पराभव केला म

बसरूरवर सागरी मोहीम केली. भारतातील शिवाजी महाराज हे एकमेव राजे ज्यांनी आरमारी मोहीम केली. ७०० कि.मी.ची ही मोहिम. जो विक्रम पन्हाळ्यातून ७७००० फौजेच्या तावडीतून सुटताना केला तोच विक्रम आठ्यातून
सुटताना मोडीत काढला. २६०,००० मोगलांच्या हातावर तुरी देत दिवसाढवळ्या १७ ऑगस्ट १६६६ ला महाराज आण्यातून निसटले आणि पूर आलेल्या नद्या पार करत केवळ २४ दिवसात राजगडावर दाखल झाले.

एकच दक्षिण दिग्विजयी मोहीम केली आणि स्वराज्याची सीमा नाशिक बागलाण ते तामिळनाडू-जिंजी अशी सहा राज्यात विस्तारली. तब्बल १८ महिन्यांची ही महाराजांच्या आयुष्यातील एकमेव मोहीम. आणि याच मोहिमेतून जिंजी किल्ला मिळाला आणि स्वराज्य रक्षण झाले ते या वाढलेल्या सीमेमुळे. आणि याच मोहीमेमुळे औरंगजेबाची २७ वर्षे या मातीत वाया गेली आणि तो कंगाल अवस्थेत या मातीतच गाडला गेला. २७ वर्षे सात लाख लष्कर लढून खजाना संपून देखील मराठा राज्य न जिंकता येणं म्हणजेच मराठ्यांनी केलेला हा प्रदिर्घ युद्धाचा जागतिक विक्रमच होता. आपलं राज्य राखण्यासाठी तब्बल २७ वर्षे झुंज देणारी एकमेव जात, एकमेव देश आणि एकच रयत ती आपल्या शिवाजी महाराजांची. याला म्हणतात स्वतःचा विक्रम स्वतः मोडीत काढण्याचा विक्रम.

आपणही आपल्या आयुष्यात याच पद्धतीने कामे केली तर आपल्याही नावावर नवनवे विक्रम नोंदले जातील. गरज आहे ती फक्त आपल्या गुणांवर, क्षमतांवर लक्ष केंद्रित करून त्या विकसित करण्याची. जगाशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःशी स्पर्धा करणं हाच त्याचा एक मुलभूत नियम आहे. तो आपण पाळ्या आणि विकसित होऊया.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!