८६,यश अपयश
एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नसतो, तर एकदा हरल्याने कोणी एफकीर होत नसतो. यशासाठी जिंकण्याची सिरीज होणे जरुरी असते. ड्रीमगर्ल हेमामालिनी, अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या सिरीज झाल्या. यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व अपयशी लोक दिसतील. तुम्ही ज्यांच्याकडे पाहून कार्य कराल तुम्ही तसेच बनाल.
गाडी चालविताना आपण ९९ टक्के पुढे पाहतो व १ टक्के मागे पाहतो. तसेच यशासाठी ९९ टक्के यशस्वी लोकांकडे पहा व १ टक्के जे अपयशी झाले, ते का अपयशी झाले ते पाहून त्यांनी केलेल्या चुका तुम्ही करू नका. एखादे अपयश आले तर धीर सोडू नका. तुम्हीही नक्कीच यशस्वी होणार.
Success या शब्दात S हे अक्षर ३ वेळा येते तर C हे अक्षर दोन वेळा येते. परंतु Failure मध्ये एकही अक्षर रिपीट होत नाही. याचाच अर्थ असा की, एकच काम परत परत केल्यास, यश मिळते व तुम्हीं रोज नवीन काम करायला लागलात तर कोणत्याच क्षेत्रात यश मिळणार नाही.
शेतात जर बोअरवेल घ्यायचे असेल तर एकाच ठिकाणी ५०० फूट बोर घ्या. पाणी नक्कीच लागेल. परंतु त्याऐवजी तेवढ्याच खर्चात तुम्ही १०:१० फुटाचे ५० ठिकाणी बोर घेतल्यास कुठेच पाणी लागणार नाही. म्हणून यशासाठी एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
