११०.निराश, उदास होऊ नका।
कधीकधी अपयश आल्यामुळे आपण नाराज, निराश होती, आपल्याच बाबतीत असे का घडले, असे समजून आपण खूपच दुःखी होतो. अशा वेळी तुम्ही सकारात्मक विचार करा. तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवत असतात, आपण जर नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीत तुम्हाला अडचणीच दिसतील. आणि तुम्ही सकारात्मक विचार केल्यास, प्रत्येक अडचणीत तुम्हाला संधीच दिसतील. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्निपंख विग्ज ऑफ फायर या आत्मचरित्रात एक अनुभव सांगितलाय. ते डेहराडून एनडीएसाठी सिलेक्ट झाले नाहीत म्हणून खूप निराश झाले आणि उत्तराखंडमधील ऋषिकेशला गेले.
गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्वामी शिवानंद यांचा आश्रम आहे. त्यासमोरच गंगा नदीच्या एका शिळेवर ते बसले. त्या शिळेखालून नदी वाहत होती. कलाम यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यावेळी स्वामी शिवानंदानी पाहिले की एक तरुण धोकादायकरीत्या शिळेवर बसला आहे म्हणून त्यांनी आवाज दिला, बाळा पडशील! कोण आहेस तू? काय करतोस? इकडे ये! त्यांनतर कलाम हे स्वामींजवळ गेले. स्वामींनी विचारले कुठून आलास? तेव्हा कलाम म्हणाले- केरळ राज्यातून आलोय. अरे तू तर आमच्या आद्य शंकराचार्याच्या गावावरून आला आहेस. आत चल, हातपाय धुवून जेवण कर. कलामांना खूप भूक लागली होती. जेवण झाल्यावर स्वामी शिवानंद म्हणाले, बाळा आता बोल काय अडचण आहे. कलाम म्हणाले महाराज मी खूप प्रयत्न करूनहीं माझी निवड एनडीए मध्ये झाली नाही. वाटले होते विमानाचा पायलट होऊन विमान उडवीन, पण फेल झालो. बहिणीचे दागिने गहाण टाकून इथपर्यंत आलो होतो. आता तर परत जायलाही पैसे नाहीत. म्हणून आत्महत्या करण्यासाठी त्या शिळावर बसलो होतो. महाराज तुम्ही ज्ञानी आहात. इतका प्रयत्न करूनही मी फेल का झालो? ते तुम्ही मला सांगा. स्वामी शिवानंद म्हणाले बेटा, परमेश्वराने तुला विमानाच्या पायलटपेक्षाही खूप मोठ्या पदासाठी निर्माण केले आहे. तू नाराज न होता, पुन्हा मोठे प्रयत्न कर. तू नक्कीच खूप मोठा व्यक्ती बनणार आहेस. स्वामींनी परत जाण्यासाठी पैसे व आशीर्वाद दिला. त्यानंतर कलाम पुढे शास्त्रज्ञ झाले. भारताचे मिसाईल मॅन झाले. त्यांनंतर सर्वात यशस्वी व प्रसिद्ध राष्ट्रपती झाले. म्हणूनच अपयश आले तरी नाराज न होता तुमच्यासाठी सुद्धा परमेश्वराने चांगल्या संधी निर्माण केल्या आहेत त्या स्वीकारा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
