१११.तू जब जागे तभी सवेरा !
एक माणूस एका तपस्वी ऋषीकडे गेला आणि म्हणाला मला माझ्या यशाचा मार्ग दाखवा. ऋषींनी एक गोल खडा दिला आणि सांगितले की बाजारात जाऊन याची किंमत किती आहे, ते मला सांग. तो माणूस एका भाजीवाल्याकडे गेला. त्याने १० रुपयांना मागितला. एका फळ विक्रेत्याने १०० रुपयांना मागितला, एका काचवाल्या दुकानदाराने ५०० रुपयांना मागितला. शेवटी तो एका जवाहिरीकडे गेला. त्याने सांगितलं की तुला जेवढी किंमत हवी तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तू मला हा खडा दे. तो परत ऋषीकडे गेला आणि सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ऋषी म्हणाले की, हा हिरा आहे. त्याची
किंमत न करता येण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे तुझे मन, मेंदू, बुद्धी आणि तुझा आत्मा जर एक केलास तर तुझी किंमत अनन्यसाधारण आहे. असे म्हणतात गई सो गंगा, और रहा सो तीरथ। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एखादे अपयश आले तर, ते सोडून पुढे काय करायचे हे जर तुम्ही ठरविले तर, तुमच्यामध्ये अविश्वसनीय बदल घडून तुम्ही निश्चित यशस्वी होऊ शकता, लंडनमधील एक सत्य घटना सांगतो. एक हुशार मुलगा परीक्षेत नापास
झाला, घरच्यांनी आणि नातेवाईकांनी टोकल्यामुळे हा मुलगा निराश होऊन जीव देण्यासाठी समुद्राकडे चालत निघाला, दुपारी थकल्यामुळे एका बागेत बेंचवर बसला, त्याला झोप लागली, बाजूला एक चर्च होते त्या चर्चमध्ये प्रार्थनेची वेळ झाल्याने पुजारी घंटा वाजवू लागला, त्या घंटेचा आवाज टंग टंग असा येत होता. या मुलाचे नाव बेलिंग्टन होते, अर्धवट झोपेत असलेल्या चेलिंग्टनला घटेतून टंग टंग वेलिंग्टन मेअर ऑफ लंडन असा आवाज आल्याचा भास झाला. तो जागा होऊन विचार करू लागला, मी तर जीव द्यायला निघालो होतो. आणि हा आवाज येतोय, काय प्रकार आहे. कदाचित त्या परमेश्वराची इच्छा असेल, की माझा जन्म जीव देण्यासाठी नसून लंडनचा मेअर, म्हणजे महापौर होण्यासाठीच असेल. तो मुलगा परत घरी आला, आता त्याला त्याच्या जीवनाची दिशा सापडली होती. तो नीती, नियम व सिद्धांताने कामाला लागला. आणि वयाच्या २५ व्या वर्षी तो लंडनचा सर्वात तरुण महापौर झाला, यालाच म्हणतात तू जब जागे तभी सवेरा. म्हणूनच जीवनात एखादे अपयश आले म्हणून घाबरून जाऊ नका. मनुष्य जन्म दुर्मिळ आहे, स्वतःला ओळखा, आवडीचे क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत बना. तुम्ही जीवनात निश्चित यशस्वी होऊ शकता.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
