११. विस्ताराची रणनिती बनवा.
२) मोहीम –
शिवबाराजे राज्य विस्ताराची दुसरी पद्धत किंवा रणनिती म्हणजे मोहीम. मोहीम म्हणजे दिग्वीजयी मोहीम. एक दिशा पकडायची आणि तिच्या शेवटच्या टोकाला जिंकेपर्यंत परत माघारी फिरायचे नाही. ही मोहीम म्हणजे व्यापक विस्ताराची Massive Expansion रणनिती असते अशी मोहीम ही एका दमात प्रचंड असा राज्यविस्तार करणारी असते. अशा मोहिमेत भरपूर सैन्यबळ तयार करून ते सोबत घ्यावे लागते. जोपर्यंत मोहिमेचा शेवट होत नाही तोपर्यंत परत राजधानीकडे यायचेच नाही याचे नाव ती मोहीम. मग यात किती वेळ लागेल, किती युद्धे करावी लागतील, किती लढाया कराव्या लागतील, किती चकमकी झडतील आणि किती छापे पाडले जातील, किती सैनिक कामी येतील याला काही हिशोब नसतो. तेव्हा अशी मोहीम आखताना दोन गोष्टींची नेहमी काळजी घ्यावी लागते. या दोन गोष्टींची खात्री झाल्याशिवाय दिग्विजयी मोहिमेला हात टाकणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रण दिल्यासारखे होते म्हणून तशी खात्री करावी आणि मगच मोहिमेचा निर्णय उचित काळ वेळ आणि प्रसंग पाहून घ्या.
तर ज्या दोन गोष्टींची खातरजमा कराव्या त्या खालीलप्रमाणे
१) राज्याच्या रक्षणाची खात्री
२) सैन्य अजिंक्य असल्याची खात्री
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
