१३. वेगाने यश मिळविण्यासाठी काय करावे?
आयुष्यात एकच गोल ठेवा. गोल गोल फिरू नका.
शिवबाराजे जर तुम्हाला वेगाने यश मिळवायचे असेल तर ते कसे मिळवावे याबाबत आज मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे त्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात यश मिळवायचे असेल तर जुनी माहिती कालबाह्य माहिती उपयोगी पडणार नाही. तेव्हा ताजी ताजी माहिती सततचे अपडेट जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला तसा निर्णय घेता येईल आणि निर्णय घेतला की मगच तशी कृती देखील करता येईल. तेव्हा वेगाने यश मिळवण्याच्या बाबतीत तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि वेगाने यश मिळविण्याच्या याच तीन पायऱ्या देखील आहेत.
त्या तीन गोष्टी कोणत्या तर त्या खालीलप्रमाणे –
१) माहिती मिळविणे अत्यंत उपयुक्त आणि ताजी माहिती मिळविणे.
२) निर्णय घेणे त्वरीत निर्णय घेणे
३) कृती करणे – लगेच कृती करणे
यातील पहिली गोष्ट म्हणजे माहिती मिळविणे, आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रातील ताजी ताजी माहिती सतत मिळवत रहा. अपडेट माहिती दोन गोष्टींसाठी मिळविणे अत्यंत आवश्यक असते. मिळणाऱ्या
माहितीतून दोन प्रकारच्या गोष्टी संभवतात.
१. संधी
२. धोका
मिळालेल्या माहितीतून जर काही संधी निर्माण होत असेल तर लगेच तसा निर्णय घेतला तर मोठा फायदा होऊ शकतो आणि जर मिळालेली माहिती धोक्याची सूचना असेल आणि अशा परिस्थितीत सुद्धा जर तत्परतेने सूत्रे हलवत निर्णय घेतला तर मोठा धोका टळू शकतो किंवा मोठा तोटा होण्यापासून आपणाला आपले राज्य, आपली रयत या सर्वांचे रक्षण करता येऊ शकते. तेव्हा एक जागरूक राजा म्हणून एक जागता उद्योजक म्हणून तुम्हाला कायम हे लक्षात ठेवून चालावे लागेल की तुम्हाला जर आपले राज्य टिकवायचे असेल, वाढवायचे असेल आणि राखायचे देखील असेल तर त्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आपले स्पर्धक काय करत आहेत आणि बाजारात काय हालचाल आहे याची सतत नवनवीन अद्यावत अशी माहिती तुमच्याकडे येत राहिली पाहिजे. यासाठीच गुप्तहेरांची जास्तीत जास्त भरती करावी लागेल आणि त्यांच्याकडून सक्षमपणे काम करून घ्यावे लागेल. जर आपणाला माहितीच मिळाली नाही तर आपणाला योग्य तयारी करता येणार नाही आणि मग आपण योग्य प्रकारे तयारीत नसू तर दुहेरी नुकसान होईल. एक म्हणजे चांगल्या संधीपासून आपणाला वंचित रहावे लागेल आणि दुसरे म्हणजे एखाद्या मोठ्या धोक्याला आपणाला सामोरे जावे लागेल. आणि जर असा एखादा खूपच मोठा धोका असेल तर त्या एका चुकीमुळे संपूर्ण राज्य गमवावे लागू शकते. तेव्हा कायम सतर्क राहणे, नवनवीन घडामोडींची माहिती सतत मिळवत राहणे हाच एकमेव यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
जिजाऊसाहेबांच्या या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपले गुप्तहेर खाते सतत कार्यरत ठेवले. सर्वात जास्त पगार आणि बक्षीस हेरांसाठी ठेवले. शिवाय या व्यतिरिक्तची माहिती मिळत रहावी यासाठी स्वराज्यातील फिरस्ती करणाऱ्या जाती-जमाती यांना विश्वासात घेतले आणि त्यांनाही स्वयंप्रेरित गुप्तचर बनविले. यात मग काही भिल्ल होते तर काही मांग होते, काही धनगर होते, काही आदिवासी होते, काही वासुदेव होते, काही पिंगळे होते तर काही बंजारे होते या सर्वांची मदत घेण्यामागे एकच हेतू होता की कोणत्याही प्रकारे माहिती आपणाकडे त्वरीत पोहचती झाली पाहिजे. अपडेट माहिती मिळाली तर निर्णय घेता येईल आणि निर्णय घेतल्यावरच कृती करता येईल, तेव्हा कृती करायला अगोदर माहिती मिळायला हवी आणि ती माहिती
ताजी आणि विश्वसनीय असली पाहिजे. अपूरी माहिती, अर्धवट माहिती, दिशाभूल करणारी माहिती कामाची नसते. तेव्हा मिळणारी माहिती योग्य असावी यासाठी खबरदारी म्हणून महाराजांनी दोन गोष्टींचा नियम बनविला. एक म्हणजे माहिती अचूक असेल तर योग्य ते चक्षीस आणि दुसरे म्हणजे जर माहिती चुकीची निघाली तर मग मात्र मोठी शिक्षा, दंड कदाचित मृत्यूदंड देखील. त्यामुळे महाराजांना कधी कोणी चूकीची माहिती देण्याची हिंमत केली नाही.
आपणही आपल्या आयुष्यात हेच तत्त्व समजून घ्या की जे आपणाला योग्य माहिती देतात ते आपले मित्र असतात आणि जे लोक आपणाला चूकीची माहिती देतात जे आपली दिशाभूल करतात तेच आपले खरे शत्रू असतात. तेव्हा मित्राचे कपडे घातलेले शत्रू आणि शत्रूच्या रुपात दिसणारे मित्र या दोघांची नीट पारख करायला शिका. मित्रामध्ये तुमचा कोणी शत्रू असू नये आणि शत्रूमधील काही लोक आपले मित्र बनवल्याशिवाय राहू नका. शत्रूच्या गोटातील अचूक माहिती मिळविण्याचा तोही एक मार्ग आहे. थोडक्यात काय तर सर्वत्र आपल्या सैन्यात आपल्या रयतेत आणि आपल्या शत्रूच्या गोटात देखील आपली माणसे असली पाहिजेत. जेणेकरून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून का होईना पण आपणाला योग्य वेळी योग्य माहिती मिळालीच पाहिजे.
काही हलगर्जी लोकांना माहिती मिळते योग्य माहिती मिळते तरी देखील ते निर्णय घ्यायचा आळस करतात आणि मग कृती करायला तर खूपच उशीर झालेला असतो आणि असेच लोक अपयशाचे सतत धनी होत राहतात. त्यांना हे माहीतच पडत नाही की नुसती माहिती मिळून उपयोग नाही तर त्याचा निर्णय घेऊन लगेच कृती करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. अशा लोकांनी हे समजून घ्यावे की
Information is not power, it’s only potential power Knowledge is not power it’s only potential power Implimantation of information Leads to transformation
आपल्या काळात तर आपणाला काही मिनिटात सेकंदात माहिती मिळण्याची सोय आहे. आपण याचा नीट उपयोग केला पाहिजे. आज आपणाला वर्तमान पत्रे, प्रसार माध्यमे, सामाजिक माध्यमे यातून गुगलवरून हवी ती माहिती काढता येते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माहितीच्या युगात आपण फक्त आपल्याला ज्या क्षेत्रात यश मिळवायचे जे आपले क्षेत्र आहे त्याचीच माहिती घ्या. त्यावर निर्णय घ्या आणि लगेच कृती करा. नुसतीच माहिती जमा करत बसू नका. त्यावर काही कृती देखील करायला वेळ काढा.
आता दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घेणे. मिळालेली माहिती खरी की खोटी ती कितपत योग्य याची शहानिशा केली, खात्री पटली की लगेच निर्णय घेणे महत्त्वाचे असते. घाईघाईत निर्णय घेणे आणि अत्यंत उशीरा निर्णय घेणे या दोन्ही गोष्टी धोकादायकच तेव्हा त्या टाळा. अजिबात विचार न करता घेतलेला निर्णय महाग पडतो. आणि खूपच विचार करत बसून उशीरा घेतलेला निर्णय काही फायद्यात पडत नसतो. तेव्हा योग्य वेळी योग्य वेळात योग्य निर्णय हे तत्त्व लक्षात ठेवा. प्रसंग पाहून निर्णय किती त्वरीत घ्यायचा ते ठरवा. तुमच्या हाती किती वेळ आहे हे ही लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. जेवढा कमी वेळ तुमच्याकडे असतो तेवढा मग त्वरीत निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. निर्णय चुकेल या भीतीने निर्णय घेणे टाळू नका. उशीर करू नका कारण जर तुमचा निर्णय चुकला तर किमान अनुभव तरी मिळेल आणि जर निर्णय योग्य निघाला तर मग आत्मविश्वास तरी वाढेल. तेव्हा निर्णय घेतला तर दोन्हीपैकी एकतरी फायदा पदरात पडतोच. पण जर निर्णय घ्यायला टाळाटाळ केली तर मग मात्र अनुभव नाही तर अत्यंत वाईट अनुभव येऊ शकतो, तेव्हा आयुष्यात एकवेळ चुकला तरी चालेल पण निर्णय घेत जा, वाट पहात अमर्याद वेळ वाया घालवू नका. कारण जर अत्यंत अमूल्य असा वेळ जर हातातून निघून गेला तर मग वेळच आपला निर्णय लावेल तेव्हा निर्णय घेत चला. आपला निकाल लागू नये म्हणून तरी.
आत्ता तिसरी गोष्ट म्हणजे कृती करणे. तुमची माहिती आणि निर्णय आणि कृती यात जेवढा वेळ कमी असेल तेवढी यशाची जास्त हमी असते. त्यामुळे माहिती निर्णय आणि कृती यात जेवढा वेळ कमी असेल तेवढी यशाची जास्त हमी असते. त्यामुळे माहिती, निर्णय आणि कृती यात जेवढा वेळ कमी असेल तेवढी यशाची जास्त हमी असते. त्यामुळे माहिती निर्णय आणि कृती यात जास्त वेळेचे अंतर पडू देऊ नका. आपण निर्णय घ्यायला उशीर केला तर जवळपास ५०% यश कमी होते आणि त्यानंतर परत कृती करायला उशीर केला तर मग आणखी ५०% यश कमी मिळते. म्हणजेच शून्य टक्के यश, मग मेहनत घेऊन काय फायदा? तेव्हा निर्णय वेळेतच घ्या आणि कृती देखील वेळेतच करा.
आता कोणतीही कृती करताना Action घेताना ती कशी घ्यायची ते सांगते ते नीट समजून घ्या. शिवबाराजे आयुष्यातील कोणतीही कृती करताना खालील पाच पायऱ्या असतात त्या नीट चढायच्या म्हणजे यशाचे शिखर सहज गाठता येते.
१) माहिती नीट ऐका – Listen properly
२) माहिती नीट समजून घ्या understand is properly
३) त्यावर नीट चिंतन करा meditate properly
४) योग्य तेवढं घ्या अनावश्यक ते वगळा Digest
५) अंमलात आणा – Apply
तर आता या पायऱ्या एक-एक करून नीट समजून घ्या.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
