१४. योग्य सल्लागार सोबत ठेवा.
जे लोक आपले काम धंदे सोडून दुसऱ्याच्या कामकाजात लक्ष घालतात असेच लोक शकुनी असतात. तेव्हा यांच्यापासून खूप लांब रहा. ते लोक जे स्वतःला करता येत नाही ते दुसऱ्याला करायला सांगतात आणि जे स्वतःसाठी अयोग्य तेच काम दुसऱ्याला योग्य असल्याचा सल्ला देतात. यांना स्वतःचे राज्य, घर बसवता येत नाही म्हणूनच तर हे दुसऱ्याचे घर किंवा राज्य बुडवायला टपून असतात. दुर्योधनाला मिळालेले अर्थ राज्य हस्तिनापूरचे राज्य त्याला आरामात चालवता आले असते परंतु पांडवांच्या द्वेषापायी आणि शकुनीच्या चुकीच्या सल्ल्यापायी त्याने परत पांडवांशी पंगा घेतला. पांडव बिचारे आपले खांडववन जाळून, दगडधोंडे बाजूला करून, मोठी मेहनत करून आपले इंद्रप्रस्थ नावाचे राज्य नवे स्वतंत्र राज्य शून्यातून निर्माण करून सुखा-समाधानात जगत होते याला पहावले नाही. याने परत भानगड केली. यांना जुगार खेळायला बोलावले. शकुनीने कपटाने त्यांना हरविले. पांडवांना योग्य सल्लागार नव्हता ते जुगार खेळले आणि कमावलेले राज्य गमावले, परत वनवास परत अज्ञातवास एवढे झाले. आता परत राज्य ज्याचे त्याला द्यायची वेळ आली तर दुर्योधनाने नकार दिला. राज्य काय पाच गावे
नाहीत आणि पाच भावात एक गावही नाही. शेवटी तर म्हणाला पाच आवास मिळून एक इंचही जमीन देणार नाही मग काय युद्ध हाच एक पर्याय शिक राहीला.
आता पुढची सर्व सूत्रे श्रीकृष्णाने ताब्यात घेतली. ती पांडवांच्या ब दुर्योधनाकडे आला आणि त्याला पांडवांचे राज्य पांडवांना परत करण्याचा सल्ला दिला. यावर या पठ्ठ्याने कहरच केला, श्रीकृष्णालाच कैद करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण मोठ्या तयारीनेच गेला होता. त्याने दुर्योधनाला तेथेच धडा शिकविला आणि सांगितले तुला युद्धाचीच खुमखुमी आहे ना तर अग लवकरच भेटू कुरूक्षेत्रावर.
त्याप्रमाणे कौरव-पांडव युद्धाला समोरासमोर उभे ठाकले, पांडवांनी आता स्वतःची बुद्धी वापरण्याचे बंद केले होते, ते सर्वस्वी योग्य असा सल्लागार श्रीकृष्ण यांच्यावर अवलंबून होते. श्रीकृष्णालाही पांडवाबद्दल मनात आस्था होती. त्याने पहिल्या दिवसापासून युद्धाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. पांडवांच्या समोर त्यांचे नातेवाईक आले, गुरूजन आले तर ते नमीट निर्णय घेऊ शकत नाहीत हे माहित असल्यामुळेच त्याने धृष्टद्युम्न याला सेनापती बनविले. तिकडे दुर्योधनाला सल्लागार शकुनी सतत चुकीचे सल्ले देत गेला आणि कौरवांना दररोज मार खाण्याची पाळी आली. एका पाठोपाठ एक सेनापती मारले गेले की नवीन नेमावे लागायचे, इकडे पांडवांकडे मात्र एकच सेनापती शेवटपर्यंत होता. आणि एकच उत्कृष्ट सल्लागार शेवटपर्यंत कौरवांना पुरून उरला.
या युद्धाचा शेवट काय झाला म्हणाल तर कौरवांकडील एकही सेनापती आणि योद्धा जीवंत राहिला नाही आणि पांडवांपैकी एकही पांडव किंवा त्यांचा सेनापती मारला गेला नाही. या युद्धात अभिमन्यू मारला गेला तो कपटाने आणि भीमपुत्र घटोत्कच माला गेला तो अर्जुनाला वाचविण्यासाठी. हे दोन अपवाद आणि झोपेतच मारले गेलेले द्रौपदीचे पाच पुत्र सोडले तर सर्व पांडव सुखरूप होते. या सर्वाला जबाबदार एकच गोष्ट घडली आणि ती म्हणजे पांडवांकडे एक अत्यंत योग्य असा सल्लागार होता आणि तो पांडवपिक्षा हुशार, अनुभवी, मुत्सद्दी, चाणाक्ष होता तसाच तो पांडवांचे कल्याण करू इच्छीणारा असा अत्यंत हितचिंतक देखील होता.
तेव्हा शिवबाराजे एक सल्लागार आयुष्यात एवढा मोलाचा ठरतो, तेव्हा अशी बुद्धिमान, पराक्रमी माणसे शोधा. त्यांना जवळ करा आणि वेळप्रसंगी त्यांचा सल्ला घेत आपले राज्य राखा आपले राज्य वाढवा,
राजमाता जिजाऊसाहेब यांच्या शिकवणीप्रमाणे महाराजांनी अष्टप्रधान मंडळात कायम आपणापेक्षा हुशार, अनुभवी, चतुर माणसे सल्लागार म्हणून नेमली. शिवाय त्यांनी राजमाता जिजाऊ यांनाच श्रीकृष्णाप्रमाणे आपले मार्गदर्शक आणि गुरू म्हणून कायम सन्मान देत त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला नाही. शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना केवळ आईच्या जागीच न पाहता गुरूच्या जागी सुद्धा पाहत आले. आणि म्हणूनच अफझलखान वधापासून ते पन्हाळ्यापासून सुटका ते आठ्यातून सुटका ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असा सर्व महत्त्वाच्या प्रसंगी जिजाऊ मातेचा सल्ला महाराजांना मोठा कामी आला.
जगात प्रत्येक मुलाला आई असतेच पण आईच गुरू झाली अशी एकमेव माता या विश्वात झाली आणि ती म्हणजे राजमाता जिजाऊ. म्हणूनच म्हणावे वाटते,
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते पाहिले विजयाचे सोहळे
जिजाऊ तुम्ही नसता तर नसती उरली अंगणी तुळस
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले मंदिरांचे कळस
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते उभे राहीले स्वराज्य
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवबाराजे.
तेव्हा यातून आपण एकच गोष्ट शिकायची आणि ती म्हणजे आयुष्यात योग्य सल्लागार नेहमी सोबत ठेवा आणि चुकीचा सल्ला देणारांपासून कायम लांब रहा. एकवेळ चांगला सल्लागार मिळाला नाही तर जागेवर थांबा पण चुकीचा सल्लागार मिळाला तर मग मात्र मोठं नुकसान होईल. तेव्हा आपण
ज्याच्या सल्ल्यावर अवलंबून असाल तो प्रामाणिक हुशार आणि आपले हितसंवर्धन करणाराच असेल याची खात्री करा आणि मगच त्याची नेमणूक करा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
