१५.आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.
६) कोणाला तरी जबाबदार माणसाला अहवाल देत चला
शिवबाराजे तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे ना तर मग जबाबदारी हा विषय गांभिर्याने हाताळा. यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या माणसाने असा एक माणूस सोबत ठेवावा जो आपणापेक्षा ज्ञानी, अनुभवी असेल आणि अशा माणसाला तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा अहवाल दिला पाहिजे. असा एक माणूस तुमच्या सोबत असू देत जो तुम्हाला सतत मार्गदर्शन करू शकेल. तुमच्याशी त्या विषयावर अत्यंत जबाबदारीने सकारात्मक आणि निर्णयात्मक चर्चा करू शकेल. तुमच्या शंका, अडचणी यांचे निरसन करू शकेल अशा जबाबदार माणसाला तुम्ही गुरू, शिक्षक, हितचिंतक, मार्गदर्शक असे काहीही म्हणा. कदाचित तो तुमचा प्रशिक्षक पण असू शकतो.
असा माणूस आपणासोबत असणं म्हणजे आपण जबाबदारीने आपले काम पूर्ण करणे आणि तो अहवाल अशा माणसाला दाखवणे जेणेकरून ज्या चुका आपणाला दिसत नसतील त्यावर प्रकाश टाकता येईल. ज्या गोष्टी आपल्या नजरेतून सुटू शकतात त्याच गोष्टी बरोबर आपल्या मार्गदर्शकाला दिसू शकतात. ज्या कमतरता आपणाला काही कळल्या नसतील त्या आपणाला या मार्गदर्शकामुळे कळून येतात. म्हणून आपले कार्य आणि कार्यपूर्ती याबाबत अशा जबाबदार माणसाशी संवाद करत चला.
प्रत्येक यशस्वी माणूस असं Accountability structure बनवत असतो. जी व्यक्ती जबाबदारी निश्चित करत नाही आणि जबाबदार माणसाकडून त्याची पडताळणी करीत नाही ती यशस्वी होण्याच्या मार्गात स्वतःच मोठा अडथळा निर्माण करू शकते. तेव्हा Decide your Accountibility structure now.
“श्री गुरू सारीखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी” असे एक संतवचन आहे. शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्या या शिकवणीप्रमाणे आयुष्यभर काम केले. आणि राजमाता जिजाऊ यांनाच आपले गुरू, मार्गदर्शक, प्रशिक्षक मानत प्रत्येक गोष्टीचा अहवाल दिला. कधी सुचना घेतल्या तर कधी सल्ला, तर कधी मार्गदर्शन तर कधी कानउघडणीसुद्धा करायला जिजाऊ मातेने मागेपुढे पाहिले नाही. का
तुम्ही एखादे काम केले तर ते का केलं आणि एखादे काम जर बिघडले तर ते का बिघडले याचे उत्तर देण्याची तयारी म्हणजेच जबाबदारी आणि प्रत्येक यशस्वी माणूस हा जबाबदारी घेतो. जबाबदारी टाळत नाही. अहवाल द्यायला कचरत नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
