१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

शिवबाराजे आज मी तुम्हाला अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग कसा तयार करायचा याबाबत मार्गदर्शन करणार आहे. आयुष्यात सगळ्याच ठिकाणी आणि सर्ववेळा यश मिळेलच असे सांगता येत नाही. कधी तरी असं होऊ शकतं की भरपूर चांगले नियोजन करूनसुद्धा काही ना काही कारणांमुळे अपयश पदरी पडते. तेव्हा अशा वेळी निराश होऊन थांबायचे नाही. हताश होऊन बसायचे नाही. अपयश का आले या कारणाची जास्त मिमांसा करत बसायचं नाही. उलट मला यातून मार्ग काय असेल तो लवकरात लवकर शोधायचा आणि त्या संकटावर अपयशावर मात करायची. आणि हे ही लक्षात ठेवा की अपयश कधीतरी त्यांच्याच वाट्याला येतं जे काहीतरी धडपड करतात. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात किंवा जगाला एक वेगळी दिशा दाखवू इच्छीतात. जे काही करायच्या भानगडीतच पडत नाहीत ते अपयशी कसे होतील? जे कधी चाललेच नाहीत ते पडतील कसे ? जे कधी पाण्यात उतरलेच नाहीत तर ते बुडतील कसे? तेव्हा ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचं त्याने काही ना काही नवीन करत राहिले पाहिजे आणि जोखीम घेतली पाहिजे. जो कधी जोखीमच घेत नाही तो अपयशी कसा होईल आणि जोखीम न घेणं हीच आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम असते. म्हणूनच माणसाने धाडस करून, नियोजनपूर्वक जोखीम घ्यायला शिकलं पाहिजे. आयुष्यात धाडस केल्याशिवाय कोणतीही नवीन कृती शक्य नसते. त्यामुळे शहाणा माणूस हा धाडसी असतो आणि त्याचवेळी तो नियोजनाच्या बाबतीत हुशार देखील असतो.

परंतु हे एवढं सगळं करूनही जर अपयश पदरात पडलंच तरी राजे कधी निराश होऊ नका, हताश होऊ नका. थांबू नका कारण कोणतेही अपयश हे तात्पुरते असते ते कायमस्वरूपी नसते. तेव्हा अशा वेळी संयम ठेवा, शांत रहा नव्याने घडी बसवा. नवे गडी जमवा, नवे डाव टाका, नवी धोरणे बनवा आणि नव्या जोमाने पुन्हा उभे राहून यश मिळवा. तेव्हा जर आयुष्यात असे कधी झालच सगळेकाही व्यवस्थित चालले आहे असे वाटत असतानाच जर अपयश आले तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही असतो. लक्षात ठेवा नियती जेव्हा आपणासाठी संधीचे एक दार बंद करत असते तेव्हा ती आपल्यासाठी दुसरा संधीचा मोठा दरवाजा तयारच ठेवते पण तो असतो थोडा पुढे काही अंतरावर. आपण नेटाने उभे राहायचे. शिस्तीने पुढे चालायचे मोठा दरवाजा आपले स्वागत करण्यासाठी हात जोडून संधी घेऊन उभाच असतो. लक्षात ठेवा धाडसी माणसालाच संधी प्राप्त करता येते. बऱ्याच लोकांना संधी तर दिसते परंतु ती पकडण्याचे धाडस ते करत नाहीत आणि मग अपयशी होतात. काहीही न करता आलेले अपयश आणि काहीतरी करताना आलेले अपयश या दोघांत मोलाचा खूप मोठा फरक आहे. काहीही न करता आलेले अपयश हे कायमस्वरूपी असते तर काहीतरी करणाराला आलेले अपयश हे तात्पुरते असते. आणि हे अपयश जरी तात्पुरते असले तरी त्यातूनही बाहेर पडण्याचा एक मार्ग त्या धडपड्या माणसाने तयार करायचा असतोच. आणि तो मार्ग कसा तयार करायचा तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक हे ऐका आणि नीट कृती करा. अपयशातून बाहेर पडण्याचा हाच एक राजमार्ग आहे की यातून एक नवा मार्ग तयार करायचा. तो कसा तयार करायचा ते समजून घ्या.

अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग कसा तयार करावा ?

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!