१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.
४. संधीवर लक्ष द्या-अडथळ्यावर नाही
शिवबाराजे यशस्वी होणाऱ्या माणसांचे लक्ष हे कायम संधीवर असते. त्यांना अडथळे दिसत नसतात. यशस्वी माणसांना प्रत्येक अडथळ्यातसुद्धा संधी शोधण्याची नजर असते. बऱ्याचदा काय होते की संधीच्या आडून कधी कधी अडथळे येतात तर कधी कधी अडथळ्याआड एखादी मोठी संधी असते. तेव्हा यशस्वी माणसाला परिस्थिती काहीही असो दिसते ती फक्त संधी. जसं बाकी विद्यार्थ्यांना केवळ पक्षी दिसला आणि अर्जुनाला मात्र पक्ष्याचा डोळा तसं एक यशस्वी होणाऱ्या माणसाची विचार करण्याची पद्धत असते.
राजे तुम्हाला असं काम केलं तर अपयश हे पदरी येण्याचा कधी संबंधच राहत नाही. तरीही काही अपरिहार्य कारणामुळे जर अपयश आलेच तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच संधीवर लक्ष देणे अडथळ्यावर नाही. जर तुम्ही अडथळ्यावर लक्ष देत बसले तर मग अडथळ्याचीच यादी तयार होईल. आणि जर अशी अडथळ्याची यादी circle of difficulty तयार होत गेले तर मग केवळ मानसिक ताणतणाव stress वाढीला लागतील. आणि परिणामी परत आपला फोकस संधीवरून हटला जाईल, तेव्हा जर आपण संधीवर लक्ष केंद्रित करत गेलो तर मग मात्र आपली यशाची यादी यशाच्या शक्यतांची यादीच circle of possibilities तयार होत जातील आणि मग आपण त्या शक्यतांच्या वाढलेल्या यादीनुसार धोरणे strategy तयार करू शकतो आणि जास्तीत जास्त संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करून बऱ्याच शक्यता वास्तवात उतरवू शकतो. तेव्हा हेच समजून घ्या की जर आपण अडथळ्यांचाच विचार करत बसलो तर अडथळेच वाढतील आणि परिणामी आपणाला अटेंशन ऐवजी टेंशन घ्यावे लागेल. याउलट संधीवर शक्यतेवर लक्ष दिले तर मग आपण तशी धोरणे तयार करून ती अंमलात आणल्यावर लक्ष देऊ शकतो आणि जास्तीत जास्त शक्यतांना प्रत्यक्षात संधीत रुपांतर करू शकतो. तेव्हा यातून घेण्याचा मंत्र हाच आहे की, अडथळ्यावर लक्ष दिले तर अडथळेच वाढलेले दिसतील शक्यतेवर लक्ष दिले तर शक्यताच वाढीस लागतील. आता विचार करून तुम्हीच ठरवा तुम्ही काय करायचे ते? अपयशातून यशाकडे जाण्याचा आणि अपयश येऊ नये याची खात्री देणारा विचार कधी सोडू नका.
राजमाता जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे महाराजांना प्रत्येक ठिकाणी संधी दिसली आणि त्यांनी अडथळ्यातूनही संधी निर्माण केली. अफजलखान चालून आला हे मोठे संकटच होते, महाराजांनी संधीवर लक्ष केंद्रित केले आणि खान तर मारलाच पण त्याची ४५००० ची फौजही बुडवली आणि स्वराज्याचा विस्तार केवळ १८ दिवसात तिप्पट केला. शिवाय प्रचंड धनलाभ झाला, हत्ती घोडे, उंट, शस्त्रे, रसद, तंबू, राहूट्या असे करोडो रुपयांची साधनसंपत्ती देखील मिळाली. संकटापेक्षा संधीवर लक्ष देण्याचे यापेक्षा मोठे उदाहरण जगाच्या इतिहासात सापडणे शक्य नाही. तेव्हा आपणही आयुष्यात असेच संकटापेक्षा संधीवर जास्त लक्ष केंद्रित करा आणि यश मिळवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
