१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

शिवबाराजे या जगात जेवढी म्हणून माणसे यशस्वी झालेली पहायला मिळाली त्या सर्वांच्या मागे एकच प्रमुख कारण सापडले आणि ते कारण म्हणजे या लोकांनी लावून घेतलेल्या चांगल्या सवयी. आपण जसे विचार करू तशाच प्रकारच्या सवयी आपणाला लागतात आणि जशा जशा सवयी तशी कृती माणसं आपल्या आयुष्यात करतात. तेव्हा विचार, सवय आणि कृती हे टप्पे नीट समजून घ्या. राजे आज मी तुम्हाला यशस्वी लोकांच्या चांगल्या सवयी स्पष्ट करून सांगणार आहे. लक्षात ठेवा सवयी आणि यश हे दोन्ही समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु जर या सवयी चांगल्या नसतील तर त्या माणसाला कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. तेव्हा माणूस यशस्वी होणार की अपयशी हे सर्वस्वी त्याने लावून घेतलेल्या सवयींवर अवलंबून असते.

चांगल्या सवयी चांगले माणूस घडवते आणि वाईट सवयी वाईट माणूस घडवते आणि प्रत्येक माणसाला ही संधी असते की त्याने कोणत्या सवयीची सवय लावून घ्यायची. जर त्या माणसाला योग्य वयात योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्या माणसाला चांगल्या सवयी लागतात आणि त्या सवयीच्या बळावरच तो माणूस अगदी शून्यातून उभा राहतो आणि प्रचंड यशस्वी होतो.

यात आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक लावून घ्याव्या लागतात, तर वाईट सवयी आपोआप लागत असतात. संगत जशी असेल तसा परिणाम दिसून येतो. लक्षात ठेवा श्लोक, ओव्या आणि सुविचार पाठ करावे लागतात, प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवावे लागतात पण निंदा करणे, शिव्या देणे या गोष्टी कधी पाठ कराव्या लागत नाहीत. संगतीत राहिली
की माणसं या गोष्टी आपोआपच शिकतात.

तेव्हा चांगल्या सवयी आवर्जुन निवडाव्या लागतात. प्रयत्नपूर्वक जोपासाव्या लागतात आणि सतत कृतीत आणाव्या लागतात. तर अशा कोणत्या सवयी आहेत की त्या यशस्वी होऊ इच्छीणाऱ्या प्रत्येक माणसाने स्वतःला लावून घ्याव्यात ते आज मी तुम्हाला सांगते. साधारणपणे यशस्वी होणाऱ्या माणसांना खालील सात सवयी असतात.

१) वेळ पाळणे – Time keeping – Dead line वर काम करणे.

२) स्वयंशिस्त – Self Discipline

३) एकाग्रता – Concentration

४) कार्यपुर्तता काम पूर्ण करण्याची सवय Completition of work

५) विचारपूर्वक काम करणे Think and work

६) रोज वेळापत्रकावर काम करणे working on timetable

७) कृती करण्याची कटिबद्धता Action orientation

तर आता या सवयी एक एक करून कशा लावाव्यात ते आपण पाहू. यातील जेवढ्या जास्त सवयी माणूस स्वतःला लावतो तेवढाच जास्त यशस्वी तो होत असतो. आणि जर जगात आजुबाजूला तुम्हाला जर अपयशी अयशस्वी माणूस दिसत असेल तर खात्रीपूर्वक समजून जा की याला यातील एकही सवय नाही.हि म्हणूनच राजे तुम्हाला यातील सातच्या सात सवयी चांगल्या शिकून घेऊन त्या आयुष्यभर अंमलात आणाव्या लागतील जेणेकरून तुम्हाला प्रचंड वेगाने यशाकडे झेपावता येईल.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

 

error: Content is protected !!