१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा
२) दररोजचे नियोजन करणे :-
शिवबाराजे ही दुसरी अत्यंत महत्त्वाची अशी शिस्त म्हणजे दररोजचे नियोजन करणे. जी १० ध्येय तुम्ही आज पूर्ण करायची अशी नोंद केली आता ती पूर्ण कशी करायची याचेपण नियोजन करा. म्हणजे आपण ठरवलेली ती दहा ध्येये ती दहा कामे पूर्ण करण्याचे नियोजन करा. नियोजन करणं म्हणजे काय तर ती कामे कोणी करायची, कशी करायची, कधी करायची याबाबत निर्णय घेणं. सगळी कामे तुम्ही करायची नाहीत आणि सगळी कामे तुम्ही एकाच वेळी देखील करायची नाहीत हा नियोजनाचा सुवर्ण नियम तुम्ही लक्षात ठेवा. कोणी कोणते काम करायचे आहे, कोणी कोणत्यावेळी ते काम करायचे आहे आणि ते काम कसे करायचे आहे हे पूर्वनियोजित करून प्रत्येकाला ते काम पूर्णपणे होईल याची जबाबदारी देणं, साधनसामग्रीची जुळवाजुळव करणं यालाच नियोजन करणं असे म्हणतात.
म्हणूनच दररोजच्या कामाचं नियोजन दररोजचं झाले पाहिजे आणि नियोजनाशिवाय काम हाती घेणं म्हणजे ते काम बिघडवणं होय. तेव्हा ते काम पूर्णच व्हावे असे वाटत असेल तर मग नियोजनाशिवाय सुरूवात करू नका. आणि नियोजन असेल तर मग ते काम संपवल्याशिवाय थांबू नका. नियोजन करणं म्हणजेच काम पूर्ण होईल याची खरबदारी घेणं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
