१. व्यवस्थापनह्रम्हणजे काय?
३. ज्या गोष्टी वापरात आलेल्या नव्हत्या त्याच गोष्टी वापरात आणल्या.
मराठ्यांची मूळ भूमी मावळ सह्याद्री. त्यामुळे मराठ्यांना कड्यावर चढणे, तटावर चढणे, किल्ले चढणे, धावणे, पोहणे या गोष्टी लिलया जमत असत. परंतु मोगलांची आणि इतर मुस्लीम शासकांची लढाईची पद्धत म्हणजे ‘सुलतान ढवा’. सुलतान ढवा म्हणजे किल्ल्याला वेढा घालून तोफा लावून तटबंदी बुरूज पाडणे आणि मग चारही बाजूंनी हमला करणं. यात हजारो सैन्य मारलं जायचं. महाराजांनी ही पद्धत बंद केली. छानपैकी प्लॅन तयार करायचा, पूर्ण अपडेट माहिती घ्यायची आणि रात्रीच्या अंधारातच किल्ल्याला भिडायचं. थेट माळा लावायच्या आणि क्षणार्धात किल्ला ताब्यात घ्यायचा. मराठ्यांचे जे मूळ कसब होते चपळाई आणि तीस-तीस फुटांचे तट पार करण्याची शारीरिक क्षमता याचा महाराजांनी उपयोग एवढा चांगला आणि जबरदस्त केला होता की मराठ्यांनी किल्ला जिंकण्यासाठी आयुष्यात कधीही कुठेही तोफा वापरल्या नाहीत. तोफा वापरायची गरजच पडणार नाही एवढा वेग आणि चपळाईने किल्ला ताब्यात घेतला जाई. त्यामुळेच मराठ्यांनी ना स्वतः कधी तोफा वापरल्या आणि ना कधी शत्रूला वापरू दिल्या.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
