१. व्यवस्थापन म्हणजे काय?
५. जी साधने उपयोगात आहेत ती अनेक पर्यायात उपयोगात
आणली. खरं तर धरणं हे पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी उपयोगी, परंतु हेच पाणी कोणी युद्धासाठी वापरू शकतो का? शक्य वाटत नाही. पण याच अशा साठविलेल्या पाण्याचा मराठ्यांनी युद्ध जिंकण्याचे हत्यार म्हणून ही वापर केला आहे. पहिला प्रयोग याचा शहाजीराजेंनी भातवडीच्या लढाईत केलेला आहे. हा प्रयोग बाहुबली भाग-२ या चित्रपटात कुंतल देशाच्या राजधानीवर झालेला हल्ला परतावून लावण्यासाठी महेंद्र बाहुबली याने केलेला दाखविला आहे. साठवलेल्या पाण्याचा उपयोग किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी केलेला आहे. रायगडाच्या महादरवाज्याच्या वरच्या बाजूला अशी पाण्याची मोठी दोन-चार टाकी बनविलेली आहेत जी खास रायगडाच्या रक्षणासाठीच एक अंतिम पर्याय म्हणून वापरासाठी सज्ज ठेवलेली होती. माझ्या ‘शिवाजी द ग्रेट इंजिनिअर’ या पुस्तकात हे सविस्तर लिहिले आहे. ज्या वाघनखांचा उपयोग मावळातील लोक कडे चढण्यासाठी, कपारी पार करण्यासाठी वापरत तीच वाघनखे शिवाजी महाराजांनी चिलखत फाडण्यासाठी पर्यायी उपयोगात आणत प्रतापगडाचा पराक्रम गाजवला. तेव्हा आपणही यातून शिकून असे व्यवस्थापन करायला शिकले
पाहिजे.
आपल्याजवळ काय नाही याबद्दल रडत बसण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहेत तेच नीट उपयोगात आणायला शिकले तर जगात काहीच कमी पडत नसते आणि हिच शिकवण राजमाता जिजाऊ यांनी कशाप्रकारे दिली ते आता आपण पुढे सविस्तर पहाणार .आहोत
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
