२०. १००० पटीने विकास करा
शिवबाराजे तुम्हाला शून्यातून स्वराज्य तर उभे करायचे आहे परंतु ते तेवढ्याच वेगाने वाढवायचे देखील आहे. आपलं स्वप्नच आहे स्वराज्याची सरहद अहद तजांवर तहद पेशावर अशी असली पाहिजे. सिंधूचे उगमापासून ते कावेरीच्या पल्याडपर्यंत म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारत आपल्या स्वराज्यात दाखल झाला पाहिजे. यासाठी तुम्हाला खूप वेगाने काम करावे लागले. पुढील ३०-३५ वर्षात हे ध्येय गाठायचे तर तुम्हाला किमान एक हजार पटीने विकास करायला हवा.
तर आज मी तुम्हाला एक हजार पटीने विकास कसा करायचा त्याचे सिद्धांत सांगणार आहे. हे सिद्धांत नीट समजून घेऊन व्यवस्थित कृतीत आणा, अंमलात आणा. एक हजार पटीत विकास करायचा म्हणजे काय एकदम मोठा घास घ्यायचा नाही. तो हळूहळू ढाळे ढाळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. मोठे ध्येय प्राप्त करताना ते हळूहळू थोडे थोडे केले तरी पुरेसे असते. फक्त यासाठी हवे असते ते सातत्य. ते सातत्य जर कधी सोडले नाही तर मग हा एक हजार पटीतील विकास सहज शक्य आहे.
तर एक हजार पटीने तुम्हाला विकास करायचा असला तरी तुमची रोजची प्रगती केवळ ०.१% एवढीच असली तरी पुरेशी आहे. सुरुवातीचा वेग जरी ०.१% तरी एक हजार पटीत कसा विकास होऊ शकतो ती आश्चर्यात टाकणारी प्रगती मी तुम्हाला उघड करून दाखवते म्हणजे तुम्हाला त्या विस्मयकारक सिद्धांताची ताकद कळून येईल. रोजची प्रगती ०.१% म्हणजे आठवड्यातील किमान पाच दिवस काम केले असे जरी पकडले तरी ते आठवड्याला ०.५% होईल. चार आठवड्याची मिळून म्हणजेच महिना
२०% होईल तर वार्षिक प्रगती ही २६% होईल.
आऊसाहेब वर्षाचे महिने तर बाराच असतात मग १३ x २= २६ असे गणित कसे होईल. शिवबाराजे आपण आठवड्याचे गणित पकडले आहे त्यातही आठवड्यातील दिवस तर पाचच पकडेल आहेत. ३६५ दिवसांना सातने भागले तर येतात ५२ आठवडे. आणि एका महिन्यात बसतात चार आठवडे, म्हणजे १२ ४ ४ ४८ आठवडे. राहिलेले शिल्लक चार आठवडे म्हणजे एक अधिकचा महिना होय. म्हणजे या नियमाने गेले तर होतात १३ महिने x २% = २६% प्रगती. शिवाय आपण नुसते काम एके काम करायचे नाही तर आठवड्यातील किमान दोन दिवस आपले छंद, आवड, कला जोपासणे आणि कुटुंबाला वेळ देणे यासाठी राखीव ठेवलेले आहेत. यात आपले हक्काचे सुट्टीचे १०४ दिवस सोडूनही आपण वार्षिक २६% दराने प्रगती करतो. आणि प्रगतीचा हाच वेग किमान १० वर्षे सातत्याने कायम केला तर मग चक्रवाढ पद्धतीने हाच वेग होतो १००४ पट. तेव्हा राजे रोज किमान ०.१% प्रगती करत करतच आपण केवळ दहा वर्षातच १००४ पटीत आपली प्रगती करू शकतो.
आणि म्हणूनच जर एखाद्या माणसाला त्याने निवडलेल्या क्षेत्रात तज्ञ, एक्सपर्ट किंवा Geneus जिनिअस व्हायचे असेल तर त्याने किमान १० हजार तास सलग काम केले पाहिजे. किंवा मग तसे नाही झाले तर मग किमान १० वर्षे काम केले पाहिजे. त्याच्या प्रगतीचा वेग हा एक हजार पटीतच होणार याची खात्री बाळगा. यातील महत्त्वाची एकच अट आहे आणि ती म्हणजे कामातील सातत्य. तर आता सातत्य ठेवण्यासाठी आणि वेगाने काम करून एक हजार पटीने जर तुम्हाला विकास प्रगती करायची असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सात पायऱ्या देखील सांगते त्या नीट समजून घ्या. शेवटी सर्वात महत्त्वाचे काय असते तर कृती. तेव्हा कृती करण्याअगोदर स्थिती नीट समजून घ्या.
एक हजार पटीत विकास करायचा तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सात पायऱ्या खालीलप्रमाणे-
१) रोज दोन तास लवकर उठा.
२) दिवसाची सुरुवात करताना रोजची तुमची महत्त्वाची ध्येये लिहून काढा.
३) प्रत्येक दिवसाचा प्लॅन रात्री झोपताना तयार करा.
४) वेळेचा सर्वात छान उपयोग करण्यासाठी महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
५) तुमचे वाहन चालती फिरती शाळा बनवा.
६) प्रत्येक घटनेनंतर स्वतःला दोन प्रश्न विचारा.
१. मी जे केलं ते योग्य होतं का?
२. हेच मी अजून वेगळ्या प्रकारे करू शकलो असतो का?
७) जो भेटेल त्याला करोडपती ग्राहकाप्रमाणे वागणूक द्या.
तर आता यातील एक एक पायरी सांगते नीट समजून घ्या आणि योग्य प्रकारे कृती करा
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
