२०. १००० पटीने विकास करा
१) राजे दोन तास लवकर उठा.
राजे १००० पटीने प्रगती करायची असेल तर त्यासाठी लागणारी पहिली पायरी म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय. आपण सकाळी इतरांपेक्षा किमान दोन तास अगोदर उठायची स्वतःला सवय लावली पाहिजे. यासाठी लवकर नीजे लवकर उठे तया लाभे आरोग्य संपदा हा मंत्र लक्षात ठेवा. जो रात्री लवकर झोपेल तोच सकाळी लवकर उठेल. तेव्हा रात्री दहाच्या अगोदर झोपायचे आणि सकाळी सहाच्या अगोदर उठायचे. मग आता प्रश्न असा पडतो की या दोन तासात आपण जगावेगळं असं काय करायचं की जेणेकरून आपण एक हजार पटीत प्रगती करूशकतो. तर सकाळच्या या दोन तासांना आपण सोनेरी तास golden hours असे म्हणायचे. सुरुवातीचे हे दोन तास आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवितात. म्हणूनच हे पहिले दोन तास खूप महत्त्वाचे आणि दिशादर्शक असतात.
तर मग या सोनेरी तासात आपण सर्वात मोठे कोणते काम करायचे तर
यातील पहिला तास आपण आपल्या क्षेत्राचं वाचन करायचं. आणि दुसंरा तास परत आपण आपले शरीर निरोगी निरामय रहावे, सुदृढ रहावे यासाठी व्यायाम करायचा किंवा सकाळच्या प्रहरी किमान पाच ते सात किलोमीटर वेगाने चालायचे. सकाळच्या दोन तासात फक्त एवढी दोनच कामे पूर्ण करायची यालाच म्हणतात साधारण दोन तासांचे सोनेरी दोन तासात रुपांतर करणे. जेव्हा जर आपणाला एक हजार पटीत प्रगती करायची असेल तर आठवड्यातील किमान पाच दिवस हा नियम पाळायचा. एकही दिवस वाया घालवायचा नाही किंवा वेगळ्या कामासाठी खर्ची पाडायचा नाही. सोनेरी तास सोनेरी कामासाठीच उपयोगात आणायचे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
