२५.कृत्रिम बुद्धिमत्ता : Al – Artificial Intelligence

२५.कृत्रिम बुद्धिमत्ता : Al – Artificial Intelligence

या चॅट जीपीटीचे तोटेही खूप आहेत. चॅट जीपीटीबद्दल एलन मस्क म्हणतात की, हा राक्षस आहे. तुम्ही त्याला सांगितलेली सर्व कामे बिनचूक आणि तत्परतेने करील. पण तुमची एखादी चूक जर झाली तर तो तुमचा जीव घ्यायला कमी करणार नाही. अमेरिकेमध्ये याचा उपयोग करून सुपर ड्रोन बनविला व तो ५५ हजार फूट आकाशात सोडला. त्याला दुश्मनावर नजर ठेवायला सांगितले होते आणि ते दिसताच त्यांना मारण्याचे काम करीत असताना त्याला कमांड देणाऱ्याने थांबण्याची ऑर्डर दिल्यावर त्या ड्रोनने कमांड देणाऱ्यालाच लक्ष्य करून मारले. या AI व्दारे आवाजाची कॉपी करून व्हाईस क्लोनिंग फ्रॉड होऊ लागले आहेत. चॅट जीपीटीमुळे लवकरच ३० कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. यामध्ये बँक, पोस्टात काम करणारे, तिकीट विक्री करणारे, अकाउंट लिहिणारे, दारोदार फिरून विक्री करणारे सेल्स एजंट अशा अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. परंतु त्यामधून काही नोकऱ्या
निर्माण होणार आहेत. त्यामध्ये कम्प्युटर सायन्स मधून सर्च इंजिनवर काम करणारे, अॅनिमेशन, रोबोटिक इंजिनियर, डेटा अॅनालिसिस अशा करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!