जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू
६. Communication skill : संवाद कौशल्य
आणि याची दुसरी बाजू म्हणजे तुमचे अनुयायी कार्यकर्ते काय म्हणतात विनंती अर्ज करतात. नम्र सुचना करतात त्याही तुम्हाला चांगल्याप्रकारे समजण हे सुद्धा संवाद कौशल्यच आहे. आपण त्याला art of good listener म्हणतो म्हणजेच काय तर तुम्हाला यशस्वी नेता होण्यासाठी चांगला वक्ता तसेच चांगला श्रोताही होता येणं म्हणजे चांगला नेता होण्याची क्षमता येणं. तुम्ही चांगले वक्ते आहात पण आजुबाजूला काय चालले आहे याबाबत बहिरे किंवा आंधळे असताल तर अंधेर नगरी चौपट राजा होईल आणि तुम्ही चांगले कान, आणि चांगले डोळे असून जर चांगले वक्ते नसताल तर लक्षात ठेवा आंधळं दळत राहील कुत्रं पीठ खात राहील. थोडक्यात काय तर चांगला नेता होण्यासाठी कान, डोळे आणि त्याहीपेक्षा तोंड चांगल्या प्रकारे उघडे ठेवा. महाराजांची संवाद कौशल्याबाबतची आचार संहिताच सांगतो म्हणजे आणखी चांगले कळेल. महाराज यात काय बोलावे, काय टाळावे कोणाला जवळ करावे कोणाला दूर ठेवावे असा सगळा संदेश आपणाला देतात. पहा बरं महाराजाचं संवाद कौशल्याबाबतच मत.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
