२७.यश म्हणजे लॉटरी नव्हे !
असे म्हणतात, चांगल्या यशाला शॉर्टकट नसतो. तसेच शॉर्टकटने मिळालेले यश चांगले व पर्मनंट नसते. जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही; परंतु आजकालच्या जाहिरातीच्या झगमगाटात झटपट करोडपती होण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. तुम्ही यू ट्यूबवर एखादा व्हिडिओ पाहता. त्या अगोदर अशाच प्रलोभनाच्या जाहिराती येत असतात. दोन तास इंटरनेटवर काम करा व १० लाख रुपये महिना कमवा. किंवा ऑनलाईन लॉटरी, ऑनलाईन गेम खेळा व करोडो रुपये कमवा. अशा त्या जाहिराती असतात. असे कधीच होत नसते. उत्तुंग यशासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. म्हणून अशा भूलथापांच्या लॉटरीच्या नादी लागू नका. यशासाठी कष्ट, कष्ट आणि कष्टच करा व जीवनात यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
