८. Proper judgement : योग्य निर्णय
यशस्वी नेता होण्यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. अहो योग्य निर्णय घेता यावा यासाठी तुम्हाला परिस्थितीचे नीट अवलोकन करता यायला पाहिजे. तुमची नजर पारखी असली पाहिजे. तुमचे कान सतर्क असले पाहिजेत. तुमच नाक संवेदनशील असलं पाहिजे आणि त्वचा सजग असली पाहिजे. तुमच्या जीभेला वस्तु खाण्याअगोदर कळली पाहिजे. तुमचे पाउल उचलले जाण्याअगोदर दिशा कळली पाहिजे. मग वाऱ्याची दिशा पाहूच की अहो सोपं आहे शीड आपल्याच हातात आहे वारे वाहील तशी दिशा बदलवू आणि आपलं जहाज पुढे नेऊ.
तुम्हाला योग्य निर्णय घेता आला पाहिजे म्हणजे काय? तर काय करायचे, काय टाळायचे तसेच कोणाला ते काम सांगायचे आणि कोणाला सांगता कामा नये हे ठरविता आले पाहिजे. दोन पावले मागे घ्यायची किंवा पुढे झेप घ्यायची ही परिस्थिती समजून घेऊन संधी आणि धोका यांचा अंदाज बांधायचा आणि मगच ठरवायचं काय करायचं यालाच म्हणतात निर्णय घेणं. ही क्षमता आपल्यात आली की मग स्वतःकडे पाहू. आपले कोण सहकारी चांगलं काम करतात आणि कोण चांगलं केल्याचा बहाणा करतात हेही कळलं पाहिजे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
