२८.यशस्वी लोकांना फॉलो करा

२८.यशस्वी लोकांना फॉलो करा

यशस्वी लोक हे त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी झालेल्यांचा पुरस्कार (फॉलो) करतात. साधारण लोक मला सारे माहीत आहे अशी फुशारकी मारत असतात. ब्रिटिश लेखक कॉप कापिमर यांनी स्वतःच्या ५० वर्षांच्या आयुष्यात
सहा हजार पुस्तके वाचली व त्याचा सार काढून यशाचे एक हजार मंत्र हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी Do and Dont do अर्थात यशासाठी काय करावे व काय करू नये याचे मंत्र सांगितले आहेत. एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला की, सहा हजार पुस्तकांचा सार एक हजार मंत्रात आहे, तर एक हजार मंत्रांचा सार एका मंत्रात सांगा, त्यावर ते म्हणाले, Use proven success method, learn from expert. तुम्ही जेथे काम करता तेथिल सर्वोत्कृष्ट यशस्वी लोकांचा पुरस्कार करा, त्यांना फॉलो करा. नवीन रस्ता तयार करणे तसे अवघड असते पण तयार रस्त्यावरून चालणे सोपे होते हे लक्षात घ्या.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!