३. बक्षीस द्यायला शिका
साधारणपणे काम न करण्याची माणसाची प्रवृत्तीच असते. पण अशी प्रवृत्तीसुद्धा वेगाने कामाला लावायची असेल तर अशा माणसांना बक्षीस द्यायला सुरुवात केली पाहिजे. बक्षीस म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भेट पैसे किंवा पैशांनी खरेदी करता येईल अशी वस्तू. पैसा ही मोठी प्रेरणाच आहे आणि या पैशांसाठीच माणसं योग्य ती कामे करत नाहीत. अगदी समाजाला, देशाला पुढे नेणारी कामे सुद्धा अशी माणसं अडकवून ठेवतात. यांना जगाचं, देशाचं, समाजाचं काही देणघेणं नसतं. त्यांना आपले स्वतःचे जग हेच सर्वस्व वाटते आणि त्यातील गरजपूर्ती करण्यासाठी लागतो पैसा. तेव्हा अशा लोकांना पैसा चारा आणि आपले काम वेगाने करून पुढच्या कामावर लक्ष देणं केव्हाही चांगलं. “सज्जन माणसं पैशांची अपेक्षा करीत नाहीत आणि पैशांची अपेक्षा करणारे सज्जन असत नाहीत.” ज्या कामासाठी आपणाला नेमले आहे तेही काम न करणआरे समाजात अनेक लोक असतात. त्यांना कामावरील काम करण्यासाठी जादा (Extra) पैसे हवे असतात, तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला जर Extra millage पाहिजे असेल तर यांच्या Extra मागण्या मान्य करून त्यांना लगेच बाजूला करून पुढे जा. लाखो रुपयांचे काम काही हजार रुपयांसाठी थांबवून ठेवणारे हे महाभाग असतात. बक्षीस हवी असलेली माणसे कशी ओळखाल? तर जी कधी काम करताना दिसतच नाहीत. वेळेवर सापडत नाहीत आणि वेगाने कधी कामच करीत नाहीत या लाचखोरांचे वंश वाढत नाहीत किंवा कीर्ती देखील. परंतु तरीदेखील ते पैसे जमा करायचे काही सोडणार नाहीत.
तेव्हा त्यांना अगोदर बक्षीस द्या आणि मग दंड द्या. सुरुवातीला
आपणाला व्यवस्था बदलता येणार नाही. तेव्हा या व्यवस्थेत घुसा आणि व्यवस्था समजून घ्या. तिची कमजोरी आणि कामाची पद्धत समजून घेऊन वेगाने पुढे सरका. पूर्ण सिस्टीम ताब्यात घेण्यासाठी वेगाने पुढे सरका आणि एकदाचे सर्वोच्च पद प्राप्त करा आणि मग ही सर्व व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करा. व्यवस्थेच्या बाहेर राहून लांब राहून व्यवस्था कशी बदलता येईल अशी वाट पाहत बसू नका, तटस्थ राहू नका. रोगी बरा करायला त्याला हात लावावाच लागेल. जखम बरी करायला औषध लावावेच लागेल तसे हे आहे. तेव्हा बक्षीसे देत खूप वेगाने कामे करून घ्या आणि मग वेगाने सगळी सिस्टम परिवर्तन करायला सुरुवात करा.
जेव्हा आपली सुरुवात असेल जेव्हा आपण कमी असू तेव्हा जरूर सिस्टम प्रमाणे वागा आणि जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा मात्र सिस्टम बदलल्याशिवाय राहू नका.
या तत्त्वांचा अंमल करताना शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात सर्वात पहिले जे चार किल्ले जिंकले ते न लढता रक्ताचा थेंब न सांडता केवळ बक्षीस देऊन ताब्यात घेतले. सुरुवातीलाच संघर्ष करण्याचे टाळा कारण या अवस्थेत आपली ऊर्जा शाबूत ठेवणे आपला वेळ वाचविणे आणि आपला वेग वाढविणे हे खूप महत्त्वाचे असते. जो जेवढा जास्त संघर्ष करतो तो तेवढा जास्त अडकून पडतो आणि तो तेवढाच मागे पडतो तेव्हा संघर्ष शक्यतो टाळा.
एकंदरीत लागणारे सैन्य किल्ला वेढा घालायला लागणारा वेळ आणि किल्ला जिंकण्यासाठी येणारा खर्च यांचा खर्च पाहता बक्षीस द्यायला ती किती रक्कम लागते तेव्हा हा सोपा मार्ग सहज स्वराज्याच्या वाढीचा वेग वाढविणारा होता. आणि म्हणून महाराजांनी सिंहगड, पुरंदर यासारखे बेलाग किल्ले बक्षीस देऊन सहज स्वराज्यात सामील करून घेतले.
आणि जर आपल्या माणसाने पराक्रम केला, किल्ला जिंकला, युद्ध जिंकले तरीही महाराज बक्षीस द्यायला विसरत नसत. चांगले काम करणाराला बक्षीस आणि चांगले काम करण्यासाठी देखील बक्षीस. आपल्या माणसाने
चांगले काम केले की लगेच बक्षीस दिले पाहिजे आणि शत्रूच्या माणसाकडून काम करून घ्यायचे असेल तर आगाऊ बक्षीस दिले गेले पाहिजे हा बक्षीस देण्याचा सुवर्ण नियम कधी विसरू नका.
हा Golden Rule सोनेरी नियम आयुष्यात तुम्ही स्वतः वापरा आणि आपली झालेली प्रगती स्वतः पहा. तुमचा तुमच्यावरच विश्वास बसणार नाही. तेव्हा अगदी तुफान वेगाने प्रगती करायची असेल तर मोठ-मोठी बक्षीसे द्यायची तयारी ठेवा.
बक्षीस देण्यासाठी तो माणूस देशातीलच आपलाच असावा असा काही नियम नाही. बक्षीस हा वैश्विक शब्द आहे प्रक्रीया आहे ती सर्व जणांना सर्वकाळी लागू पडते. उदाहरण देतो म्हणजे कळेल की शिवाजी महाराजांनी जिजाऊसाहेबांनी सांगितलेली तत्त्वे कशी अंमलात आणली ती.
कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता सिद्धी अंबर वहाब. हा माणूस आफ्रिकेतील काळा माणूस, गुलाम माणूस शिवाय मुस्लीम माणूस. ना या देशाचा ना जातीचा ना रंगाचा अशा माणसाला शिवाजी महाराजांनी खूप चांगले प्रेरणादायी विचार, हेतू, मनसुबा सांगितला. बक्षीस दिले आणि कोंढाणा किल्ला न लढता स्वराज्यात आला. किल्ला स्वराज्यात आलाच पण किल्लेदारही स्वराज्यात आला. याला म्हणता उत्तम बक्षीस देण्याची उत्तम पद्धत. बक्षीस देऊन फक्त आपले काम करून घेऊ नका तर ज्यांना बक्षीस दिले तो माणूसही आपलासा करून घ्यावा. बक्षीस एकदाच द्या आणि माणूस एकदाचा आपला कायमचा करून घ्या. एवढी ताकद असते बक्षीसात. तेव्हा असं बक्षीस देत चला. बक्षीस देण्यासाठी बघतो, करतो, नंतर पाहतो असं अजिबात टंगळमंगळ करू नका.डी
आपलं मोठं काम करून घेण्यासाठी आणि आपला वेळ, ऊर्जा वाचविण्यासाठी पैशांवर सहज मनाने पाणी सोडा. हातात वेळ असेल अंगात ऊर्जा बाकी असेल तर अशी कित्येक कामे सहज करता येतील. या संदर्भात आणखी एक दाखला द्यावा वाटतो. तो प्रसंग आग्रा किल्ल्यातील आहे. बादशहा औरंगजेब यांच्या ५०व्या वाढदिवसाला महाराज गेले होते. बादशहाने
महाराजांना जो नजराणा देणं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी छोटा आणि तो तेवढ्याच उशीराने दिला. परिणाम महाराज भडकले आणि मग औरंगजेबाने मान-सन्मान बक्षीस म्हणून आहेर पोशाख देऊ केला. यावर महाराजांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. आपणाला शिकायला या प्रसंगात खूप जागा आहे. अरे औरंगजेबा तू मला खिल्लत कसली देतो अशी बक्षीसे तर मी माझ्या लोकांना दररोज वाटतो. ज्या दरबारात आमचा सन्मान राखला जात नाही त्या दरबारात आम्ही परत कधीच येणार नाही. आता या प्रसंगाचे दोन पैलू आहेत ते नीट समजून घ्या.
एक म्हणजे महाराज म्हणतात की अशा खिल्लती पोशाख, बक्षीसे मी दररोज माझ्या माणसांना वाटतो. स्वराज्य वेगाने मोठे होण्यामागील एक प्रमुख कारण महाराज बोलता बोलता सहज सांगून गेले आणि दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितली ती सुद्धा नेहमी लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि ती म्हणजे आपला मान-सन्मान राखला जात नाही त्याठिकाणी फिरकू नये. एक मिनिटसुद्धा थांबू नये. ज्यांना आपली किंमत कळत नाही अशा लोकांसोबत थांबून आपली असलेली किंमत कमी होते. शिवाय तेवढ्याच वेळात बाकीची कामे करून आपण आपली जी आणखी किंमत वाढवू शकतो ती वेळ आणि संधी सुद्धा आपल्या हातातून निघून जातात. तेव्हा हे टाळण्यासाठी अशा ठिकाणी न जाणं गैरहजर राहणं अधिक चांगलं.
तेव्हा या प्रकरणातून आपण काही गोष्टी शिकलो ते लक्षात ठेवा.
१) बक्षीस द्यायला शिका – चांगले बक्षीस, ताबडतोब बक्षीस द्यायला शिकणं २) जो जमा करत जातो तो इतिहास जमा होतो आणि जो वाटत जातो तोच वाढत जातो. तेव्हा वाटायला शिका आणि आपली वाट बनवायला शिका.
३) जिथे आपला मान-सन्मान राखला जाण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी जाऊ नये.
४) माणसं हेरा- पैसे पेरा – वेगाने कामे करा.
तेव्हा वागा सन्मानान ! जगा सन्मानानं !! आणि लोकांनाही वागवा सन्मानानं !!!
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
