६७.Results are awarded, Efforts are not

६७.Results are awarded, Efforts are not

शेवटच्या ठोक्यात दगड तुटतो किंवा फुटतो. याचा अर्थ असा नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी शेवटपर्यंत केलेला प्रत्येक प्रयत्न तितकाच महत्वाचा असतो. जगातील सर्वात मौल्यवान गुण म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास.

रिझल्ट म्हणजे परिणाम किंवा निकाल. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. याचा अर्थ असा आहे, की प्रयत्नाला बक्षीस मिळत नाही तर ते फक्त निकालालाच मिळते. ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स अशा स्पर्धामध्ये जिंकलेल्या व हरलेल्या खेळाडूचे कष्ट जवळजवळ सारखेच असतात; परंतु पदक मिळविणाऱ्याला जग डोक्यावर घेते. त्याला मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा असे सर्व काही मिळते. पण हारणाऱ्यांचे नाव पण घेतले जात नाही किंवा लक्षात राहत नाही. म्हणूनच म्हणतात, Results are awarded Efforts are
not. तुमच्या कार्यात रिझल्ट अर्थात यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न करीतच रहा व जीवनात यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!