४४.सगळा खेळ मानसिकतेचा Mind set & Mind Power
माणूस सर्वात जास्त प्रेम स्वतःवर करतो हे जरी खरं असले तरी एखाद्याने ब्रेनवॉश केलं तर माणूस जीव द्यायलाही तयार होतो. राजीव गांधींन एका बाईनि मानवी बॉम्बने उडविले. त्यामध्ये तीही मरणार होती हे तिला माहीत असताना कोणीतरी तिची मानसिकता तयार करून हे काम करायला लावले. यालाच माइंड सेट किंवा मानसिकता म्हणतात.
ज्या ज्या लोकांनी मोठा इतिहास रचला त्यांचे मन त्यांच्या ताब्यात होते. ते मनाच्या आहारी गेले नाहीत. दि मिरॅकल ऑफ युवर माइंड हे पुस्तक सांगते. विजेची आणि आवाजाची गती सर्वात जास्त असते. पण मनाची गती ही त्यापेक्षाही जास्त असते हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. तुमची मानसिकताच तुम्हाला रंकाचा राजा किंवा राजाचा रंक बनू शकते. तुमचे मन हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती असते. त्या मनाला चांगला खुराक द्या. म्हणजे अच्छा देखो, अच्छा पडो, अच्छा सोचो, अच्छा सुनो, अच्छा बोलो हा पॉझिटिव्ह खुराक मनाला द्या.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
