प्रेरणा म्हणजे काय ?

प्रेरणा म्हणजे काय ?

३. प्रेरणा ही सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते.

प्रेरणा ही फक्त चांगल्या कामाचीच असावी असा काही समज करुन घेऊ नका. जर तो प्रश्न संधी मिळण्याचा असेल तर तेथे लोकांना सकारात्मक प्रेरणा कामाला येऊ शकते. उदा. जास्त पगार, मोठे पद किंवा इतर काही. पण जर काही चुकीचे काम सहकारी अनुयायी यांच्याकडून घडत असेल तर त्याला दंड, शिक्षा ही द्यावीच लागते. म्हणजे इथे दंड शिक्षा ही नकारात्मक प्रेरणा होय. अमूक गोष्ट टाळावी यासाठीची प्रेरणा.

भविष्यात काही धोका, संकट मग ते राज्यावर, कंपनीवर येणार असेल आणि लोकांच्या अस्तीत्वाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर ते सहयोगी, अनुयायी यांना दाखवून द्या. ते स्वतः प्रेरणा घेऊन ते संकट टाळायला, धोका संपवायला प्रेरीत होतील. आपल्याकडे पाप आणि पुण्याच्या संकल्पना जन्माला आल्या त्याच मुळी या बाबीतून. तुम्ही
चांगलं करा चांगलं होईल बाईट करा वाईट होईल हा या प्रेरणाशास्त्राचा जगमान्य नियम सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रेरणा माणसाचं आयुष्य नियंत्रीत करतात.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!