४४.सगळा खेळ मानसिकतेचा Mind set & Mind Power

४४.सगळा खेळ मानसिकतेचा Mind set & Mind Power

मित्रांनो माणूस मनाने हरला तर शंभर टक्के हरतो आणि मनाने जिंकला तर शंभर टक्के जिंकतो. युद्ध हे अगोदर मनाने जिंकावे लागते नंतर रणांगणात जिंकले जाते. मुरारबाजी देशपांडे यांचे शिर उडवल्यानंतरही त्यांनी २२ लोकांना मारले, त्यांचे दोन्ही हात आणि दोन तलवारी चालू होत्या. कारण ते शरीराने नव्हे तर अंतर्मनाने लढत होते. अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांना एक लाख वेळा सांगितले जाते की तू हे करू नको, तू ते करू नको. म्हणून मुले पुढे चांगल्या गोष्टी करू शकत नाहीत. हा सिद्धांत सांगतो.
एका २७ वर्षाच्या तरुणाने खून केला म्हणून त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. फाशी देण्याच्या ४ दिवस आधी जेलर, जज, डॉक्टर आणि एक सायंटिस्ट यांनी त्याला सांगितले, की तुला फाशी देताना, गळ्याला फास लावून दू तडफडून तडफडून सात आठ मिनिटात मरणार आहेस. आम्ही एक प्रयोग करू इच्छितो. तुला फाशी देण्या ऐवजी कोब्रा जातीच्या सापाने तुला डंख दिला तर तू दहा सेकंदात मरशील. तुला दहा सेकंदाचे मरण हवे का सात-आठ मिनिटे तडफडून तडफडून मरायचे ते तू ठरव. त्या तरुणाने दहा सेकंदात मरण्याचा पर्याय स्वीकारला. त्यानंतर चार दिवस तो २४ तास चिचार करीत होता की मी कोब्राच्या विषाने मरणार. मृत्यूच्या दिवशी एक कोब्रा साप हातात धरलेला माणूस आणि हे चार लोक आले. ५० फुटांवरून त्याला विचारले तू तयार आहेस का? तो म्हणाला हो. त्यानंतर कोब्रा हातात घरलेला माणूस त्याच्या पाच फूट जवळ पोहोचला. त्यानंतर त्याच्या तोंडावर प्रोटोकॉल प्रमाणे काळा स्कार्फ घातला. आता त्याला काहीच दिसत नव्हते. त्यानंतर कोब्रा धरलेला माणूस हळूच मागे आला आणि त्याच्या जागेवर हातात सुई असलेला माणूस जवळ गेला आणि त्याने त्याच्या हातावर सुईने दोन टोचे मारले. आणि तो दहा सेकंदात मृत्यू पावला. महत्त्वाची गोष्ट ही की. त्यानंतर त्याचे पोस्टमार्टम केले गेले. त्यावेळेस त्याच्या शरीरात कोब्रा सापाचे विष निघाले. हा आहे मनावर झालेला परिणाम.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!