४७.ऐकायला शिका:Be a listener
यशस्वी जीवनाची ५ तत्त्वे आहेत :
१) बोलण्याआधी ऐकायला शिका.
२) खर्च करण्याआधी कमवायला शिका.
३) कृती करण्याआधी विचार करा
४) हार मानण्याआधी प्रयत्न करा आणि
५) मरण्याआधी मनसोक्त जगा.
वाचल्याने २० टक्के समजते. तर वाचून ऐकल्याने ८० टक्के समजते आणि वाचून, ऐकून आपल्या शब्दांत जर आपण दुसऱ्याला सांगितले तर १०१ टके समजते. जन्मानंतर बोलण्यासाठी २ वर्षे लागतात पण एकदा का बोलायला लागलो की, ऐकायचं नावच नाही. चुकीचे बोलल्यामुळे महाभारत, रामायण घडले, तरीही ऐकण्याची तयारी नाही. आपल्या घरात प्रत्येकाला वाटते. माझे कोणी ऐकून घेत नाही. बायको नवऱ्याचे, मुलगा बापाचे ऐकायला तयार नाही म्हणून सगळीकडे सत्यानाश होत आहे. जुन्या काळी साधुसंत मौन धारण करीत असत. म्हणूनच ते वाचस्पती होते. त्यांचा प्रत्येक शब्द खरा होत होता. अलीकडे तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जा गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकांना सल्ला देणारे तुम्हाला भेटतीलच खरे तर अनेकांना बोलण्याची बिमारी झाली आहे. जिभेला हाड नसते म्हणतात ना ते खरेच आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
