८. प्रेरणा आणि समाधान यात फरक आहे
काम करण्याची सुरुवात म्हणजे प्रेरणा आणि काम संपन्न झाल्यावर आपल्याला जो आनंद वाटतो तो म्हणजे समाधान आणि या समाधानाचं मूळ असतं प्रेरणा आणि प्रेरणेचा शेवट असतो समाधानकारक, परंतु मध्ये आहे काम. प्रेरणा घेतली काम पूर्ण झाले तर समाधान. नुसते हवेत इमले बांधून समाधान होत नसते त्यासाठी जमिनीवर येऊन इमला प्रत्यक्षात बांधावा लागतो.
लढाईला सुरुवात करणं म्हणजे लढाई जिंकणं नव्हे, प्रवासाला निघणं महणजे इच्छीत स्थळी पोहचणं नव्हे तेवढाच फरक प्रेरणा आणि समाधान यात आहे. लढाई शुरु करुन शेवटपर्यंत केली तरच जिंकली जाते. प्रवास सुरु करुन शेवटपर्यंत केला तरच ज्या गावी जायचे ते ठिकाण मिळते. तसं प्रेरणा ही सुरुवात तर समाधान हा शेवट आहे.
“Motivation is just besining and job satisfaction is the result of finishing the job.”
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
