४. एक राजा- एक उद्योजक म्हणून
२. वेळेचे व्यवस्थापन
ज्या कोणाला आपले राज्य उभे करायचे कंपनी उभी करायची त्या माणसाने वेळेचे व्यवस्थापन करण्याच्या बाबतीत अत्यंत जागरूक असले पाहिजे. आता हे वेळेचे व्यवस्थापन म्हणजे काय तर शिवबा राजे ते मी तुम्हाला आता सांगते नीट समजून घ्या. तर वेळेचे व्यवस्थापन करायची गरज त्याला पडते ज्याच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. हाताशी कामे भरपूर असतात पण हाताशी वेळ खूप कमी असतो. तेव्हा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामे कशी करायची याचे व्यवस्थापन म्हणजे हे वेळेचे व्यवस्थापन तर यासाठी काय करायचं तर आपल्या कामाचे विभाजन करायचं. Division of Labour करायचं.
१) सर्वात महत्त्वाची कामे
२) महत्त्वाची कामे
३) सामान्य दैनंदिन कामेडागा
सामान्य कामे दैनंदिन कामे आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर सोपवा. day to day work महत्त्वाची कामे अधिकारी, मंत्री, मॅनेजर यांच्यावर सोपवा. आणि सर्वात महत्त्वाची कामे म्हणजे नियोजनासंदर्भातील कामे आपण स्वतः करा.
कोणी कोणते काम करायचे ते सांगा. कसे करायचे ते त्याने ठरवू द्या. कारण तो देखील जबाबदार अधिकारी मंत्री मॅनेजर आहे.
राजाने किंवा मालकाने हात चालवायचे नसतात त्याने फक्त डोके चालवायचे असते. वेळेचे व्यवस्थापन केल्यामुळे आपली ऊर्जा वाचते आणि आपण मग तीच ऊर्जा आणखी महत्त्वाची कामे करण्यासाठी वापरायची. आपण जेवढं मोकळं राहू तेवढं आपलं मन आणि बुद्धी जास्त काम करेल तेव्हा आपले हात कामात गुंतवून कोमात जाण्याच्या भानगडीत पडायचं नाही. पैसा कामी लावा माणसं नेमा आणि त्यांनी व्यवस्थित कसं काम करावं यासाठी काही व्यवस्था बनवा. आपण वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील तीन गोष्टींचा उपयोग करू शकतो.
१. व्यवस्था system लावा
२) प्रक्रिया process बनवा
३) माणसं कामाला लावा.
म्हणजेच काय तर कामे वेगाने होण्यासाठी आणि आपला वेळ वाचविण्यासाठी माणसं पैसा आणि यंत्रे man, money, machinary हे सर्व एकाच वेळी किंवा गरजेनुसार एक-एक करून कामाला लावा. लक्षात ठेव सगळी कामे स्वतः करायला जाईल तो कधीच मोठा होणार नाही. आणि जो कोणी कामे करायला माणसं, मशीन आणि पैसे लावेल तो मात्र सहज मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. निता तेव्हा स्वतःच राज्य, स्वराज्य कंपनी असं काही तरी मोठं स्वप्न असेल तर मग हे असं वेळेचे व्यवस्थापन वेळेतच शिकलेलं बरं ! मग आऊसाहेब जी कामे मला एकट्याने करायची ती आणखी सोपी
करून सहज कशी पूर्ण करावी हे देखील सांगा. राजे तुमच्याकडे आलेल्या कामांची प्रथम विभागणी classification करा आणि ते काम कोणत्या गटात मोडते ते पहिले पहा. तुमच्यासमोर येणारी कामे फक्त खालील प्रकारची असतील.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
