४. एक राजा- एक उद्योजक म्हणून
१. do, delay, deny, dump म्हणजे काय तर ते सांगते. do म्हणजे जी कामे आता ताबडतोब करायची अशी ती अर्जंट आणि महत्त्वाची कामे delay म्हणजे महत्त्वाची असतील परंतु ती तातडीची नसतील अशी कामे नंतर करायची. deny म्हणजे जी कामे करायची नाहीत ती करायची नाहीतच. जी कामे नकारण्यासारखी आहेत ती लगेच नकारा आणि बाजूला व्हा. आता राहिली फक्त dump करायची कामे. याला Junk कामे अनावश्यक कामे म्हणतात. ती कामे तर लगेच टाकूनच द्यायची कचऱ्याच्या डब्यात. अशा प्रकारे दररोज काम करून आपला वेळ, ऊर्जा वाचवा आणि एक समूह म्हणून वेगाने काम करून पुढे जा.
३. संधी निर्माण करा grabbing opportunities
राजे जी व्यक्ती वेळेचं व्यवस्थापन न करता सगळी कामे स्वतःच करू पाहिल तो अक्षरशः त्या कामात गुंतून पडेल आणि मग त्याला नवीन गोष्टी शिकायला भविष्याचा वेध घ्यायला काळाची गती समजून घ्यायला वेळच मिळणार नाही. आणि मग त्याला येणाऱ्या नवीन संधी कोणत्या हे हेरता येणार नाही. संधी दिसली नाही तर ती पकडण्याचा प्रयोग तरी तो कुठून करणार कारण तो कामात गुंतून पडलेला असणार, जर कधी चुकून संधी दिसलीच अगदी अपवादाने किंवा अपघाताने तरी ती प्राप्त करता येणं अवघडच. कारण नको ती कामे करण्यात गुंतून पडल्यावर मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची ऊर्जा ताकद तरी कोठे शिल्लक असणार. तेव्हा जर तुम्हाला भविष्य हवे तर मोठमोठ्या संधी निर्माण कराव्या लागतील. तयार होणाऱ्या नवनवीन संधीवर नजर ठेवून त्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे आणि यासाठी तुम्ही राजा म्हणून एक मालक म्हणून कायम मोकळेच असले पाहिजे.
तेव्हा अगोदर तुम्ही वेळ निर्माण करा संधी आपोआप चालून येतील. तेव्हा आजपासून तुम्ही कमी महत्त्वाची, कमी उत्पन्नाची, गरजेची नसणारी आणि कचरा कामे करणे बंद करा. हाताशी प्रचंड राखीव वेळ ठेवा आणि अंगात प्रचंड ऊर्जा साठवत रहा. संधी आली रे आली की प्राप्त करा आणि संधीला सोनेरी संधी golden opportunity बनवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
