४. एक राजा- एक उद्योजक म्हणून

४. एक राजा- एक उद्योजक म्हणून

४. प्रक्रिया process तयार करा.

राजे ज्याला मोठं व्हायचं त्याने सगळी कामे स्वतः करायची नसतातच परंतु सगळी कामे सुरळीत पार पडण्यासाठी एक प्रक्रिया process किंवा एक system निर्माण करून घ्यायची असते. ती system सतत काम करीत राहील आणि आपलं राज्य आपला उद्योगधंदा सतत वाढवत राहील. सुरुवातीला सगळी कामे शिकून घ्या. मग फक्त निवडक कामावर लक्ष द्या आणि बाकीची राहिलेली कामे system ला लावून द्या. माणसं मशीन आणि पैशांना Auto Mode वर टाका. तुमच्यासाठी ह्या तिन्ही घटकांनी सतत काम करत राहणं यालाच प्रक्रिया किंवा system mode म्हणतात. उद्योगधंदा जसजसा वाढत जाईल तसतसा तो Pilot mode वर टाकत जा.

प्रक्रीया साधी आणि सरळ बनवा जेणेकरून ती हाताळताना अगदी सामान्य माणसाला देखील कळली पाहिजे. प्रक्रिया जटील आणि अवघड असेल अशा ठिकाणी मग तंत्रज्ञ किंवा Expert तज्ञ माणसांची गरज पडेल तशी त्यांची योग्य त्या ठिकाणी नेमणूक जरूर करा. जो धंदा किंवा व्यवसाय system मोडवर टाकला जाणार नाही तो मोठा होऊच शकणार नाही. तेव्हा system बनवा आणि systematically व्यवसाय वाढवा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!