५०.भावनात्मक स्वप्न:Emotional Dream
अनेकांची अनेक स्वप्नं असतात. कोणाचं पैसे कमवण्याचे स्वप्न असते, कोणाचं राजकीय नेता होण्याचं, कोणाचं शरीर कमवण्याचे स्वप्न, कोणाचे सामाजिक कार्याचे स्वप्न, खूप मोठे शिक्षित होण्याचे स्वप्न. तर कोणाचे धार्मिक स्वप्न असते. पण यामध्ये भावनात्मक स्वप्न हे सर्वात पावरफुल असते.
आग लागलेल्या घरात तुम्हाला जर जा म्हटलं तर तुम्ही जाणार का?
तर नाही. पण त्याच आग लागलेल्या घरात, तुमचा एकुलता एक मुलगा अडकलाय आणि तो टाहो फोडतोय, बाबा वाचवा, बाबा वाचवा, त्यावेळी तुम्ही निश्चित त्या आगीत जाऊन मुलाला वाचवणारच, कारण तुमच्या भावना. प्रेमाखातर तुम्ही स्वतःपेक्षा स्वतःच्या अतिप्रिय व्यक्तीसाठी अशक्य ते शक्य करून दाखवता ते फक्त भावनेमुळेच.
माझे माझ्या आजोबावर प्रचंड प्रेम आणि विश्वास होता. त्यांची इच्छा होती की मी शेती न करता शिकून साहेब व्हावे. आणि आपल्या दारात जिपडे म्हणजे जीप ऊभी करावी. त्या भावनेनेच मी पेटून उठलो, खूप अभ्यास करून स्टेट बँकेत साहेब झालो. आणि त्यावेळी दीड लाखाची जीप नव्हे तर ५ लाखाची कार दारात उभी केली, कारण भावना. यावरून हे सिद्ध होते की भावनात्मक स्वप्न हे सर्वात श्रेष्ठ असते. म्हणून तुम्हीही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी खूप मोठे यश आणि आनंद मिळवा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
