५७.जॅक मा यांची माकडाची गोष्ट

५७.जॅक मा यांची माकडाची गोष्ट

चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा म्हणतात, जर आपण माकडासमोर एक केळी व नोटांचे बंडल ठेवले तर माकड केळीच उचलणार. कारण माकडाला हे माहीत नाही, की या नोटांद्वारे आपण अनेक केळी विकत घेऊ शकतो. तसेच आपण जर लोकांना नोकरी किंवा व्यवसाय निवडायला सांगितले तर ९० टक्के लोक नोकरीच निवडतील. कारण त्यांना शिकविले नाही, की जास्त पैसे हे फक्त व्यवसायांतूनच मिळू शकतात. जॅक मा सात वेळा नापास झाला. नोकरीसाठी ३० मुलाखतीत एकानेही नोकरी दिली नाही. प्रसिद्ध केएफसी मध्ये त्याला वेटरचीही नोकरी दिली गेली नाही. जॅक मा १९९५मध्ये मित्रांसोबत अमेरिकेला गेला. तेव्हा त्याने प्रथमच इंटरनेट पाहिले. परत येऊन त्यावरच अभ्यास करून १९९९ला अलिबाबा डॉट कॉम नावाची कंपनी चालू केली व पुढील १५ वर्षांत तो चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. जॅक मा म्हणतात, सुरुवातीला तुम्ही चुका कराल. पण त्यामधून शिका, सुधारणा करा. ते स्वतःसाठी करा. तुमच्या क्षेत्राचे महत्त्व जाणा व यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!