५८.संयमाने व दूरदृष्टीने वागा
गरीब लोक आजचाच अर्थात शॉर्टकटचा विचार करतात. म्हणून ते गरीब गरीहतात. श्रीमंत व यशस्वी लोक संयमाने वा दूरचा विचार करून कार्य करत असतात. म्हणून ते यशस्वी व श्रीमंत होतात, मुकेश अंबानी यानी जिओ कोब करण्यापूर्वी पाच दहा वर्षे करोडो रुपये खर्च करून इन्फ्रास्ट्रक्चर उमे केले. त्यासाठी पैसा, वेळ, विचार, मेहनत लावली. यानंतर त्यानी सीम दिले व त्यानंतर पैसे कमवायला लागले. यालाच संयम आणि दूरदृष्टी मागतात. अदानी यांनी मोठ्या शहरात गॅसची पाईपलाईन टाकून घरोघरी गॅसलाईन देण्यासाठी पाच दहा वर्षांत हजारो करोड खर्च केले. विचार, वेळ, मेहनत लावून संयमाने व दूरदृष्टीने प्रत्येक घरातून ते ५०० ते एक हजार महिन्याला मिळविणार. बाहुबली, RRR सारख्या सिनेमांसाठी ५०० करोड़ रुपये खर्च करावे लागतात. वेळ, मेहनत देऊनही हे सिनेमे चालतील याची शाश्वती नसते. म्हणून तुम्ही संयमाने व दूरदृष्टीने काम करा व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
