६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

मारवाडी, गुजराती हा समाज म्हणजे एक श्रीमंत व यशस्वी बनण्याचा विचार आहे. ज्या विचाराने मारवाडी गुजराती श्रीमंत झाले तोच विचार आणि तशी वृत्ती अंगीकारली तर तुम्हीही अतिश्रीमंत व यशस्वी बनू शकता हा माझा स्वः अनुभव आहे.

असे म्हणतात वाघाच्या पिलाला शिकार आणि मारवाडी- गुजरातींच्या मुलाला व्यापार शिकवावा लागत नाही. तो त्यांच्या DNA मध्येच असतो. त्यांच्या रक्तातच पैसा, व्यापार आणि श्रीमंती असते. ते पैसे कमावण्यात व बाचवण्यात नंबर एक असतात म्हणून अति श्रीमंत असतात. ते सर्वात जास्त दानधर्मही करतात. त्यांची राहणी साधी, कपडेही साधेच असतात. ते मोठ्या घरावर, घोडागाड्यांवर वायफळ खर्च करत नाहीत. ज्याची गरज नसेल अशा वस्तू ते कदापि घेणार नाहीत.

त्यांचे धंद्याचे सूत्र असते नीचे दुकान उपर मकान. त्यामुळे त्यांचा धंदा २४ तास चालतो. घरातील कर्ता पुरूष कामासाठी बाहेर गेला तर त्यांची गृहिणी दुकान-धंदा सांभाळते. मारवाडी- गुजराती हे शाकाहारी असल्याने ते अहिंसावादी आणि अधिक धार्मिक वृत्तीचे असतात. ते रिलेशन आणि बिझनेस कधीही एकत्र करीत नाहीत म्हणून त्यांचे नातेसंबंधही कायम टिकून राहतात. भाऊबंदकी, भांडणापासून ते कोसो दूर असतात. कोर्टकचेरीच्या
भानगडीत ते पडत नाहीत. बाकी समाजाच्या तालुक्याच्या कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत भाऊबंदकीच्या केसेस चालतच असतात. कारण बाकी समाज, भुके मरेंगे लेकिन आकड नही छोडेंगे ! अशा विचाराचे असतात. मारवाडी – गुजराती हे दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवतात. जान जाये लेकिन वचन ना जाये!, या विचाराने ते वागत असतात. हवाला मार्केटचा धंदा फक्त विश्वासावरच चालत होता. व्यवसाय – धंदा बंद राहू नये म्हणून दुखवटा फक्त तीनच दिवस पाळतात. दुकान, धंदा चाललाच पाहिजे, म्हणून लग्नकार्याला घरातील सर्वच जण जात नाहीत. फिरायला, टूरवर गेले तरी ते तेथील स्वस्त मिळणाऱ्या वस्तू आणून त्या विकून टूरवर झालेला खर्चही वसूल करतात. ग्राहकांशी गोड बोलून, अर्धा कप चहा पाजून विश्वास संपादन करून ते धंदा आणि व्यापार वाढवीत असतात.

आज आपल्या देशात फक्त सहा टक्के मारवाडी गुजराती असताना, आज देशातील ६० टक्के अरबपती हे फक्त मारवाडी आणि गुजरातीच आहेत. आजकाल ते सर्वच व्यवसायांमध्ये आहेत. गुजरातला आता दुधाची राजधानी, कपड्याची राजधानी, औषधाची राजधानी, पेट्रोल गॅसची राजधानी, डायमंड म्हणजे हिऱ्याची राजधानी म्हटले जाते. यामध्ये फक्त मारवाडी आणि गुजराती आहेत.

माझ्या मते त्यांच्या अतिश्रीमंतीची मुख्य सात कारणे आहेत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!