६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?
१) ते पैशाची व्हॅल्यू म्हणजेच मूल्य जाणतात: मारवाडी गुजराती लोकांना लहान वयातच पैशाची किंमत नव्हे तर मूल्य समजल्यानेच ते इतके श्रीमंत होतात. सुरतमधील अत्यंत गरिबीत जन्मलेले आणि फक्त पाचवीपर्यंत शिक्षण झालेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त सावजीभाई ढोलकिया आज हिऱ्याचे सर्वात मोठे व्यापारी आहेत. त्यांचा टर्नओव्हर ७००० कोटींचा असून त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ६०० कार, २०० फ्लॅट व ५०० कर्मचाऱ्यांच्या
मुलीना लगात ज्वेलरी भेट दिली. मात्र त्यांचा एकुलता एक मुलगा द्रव्य ढोलकिया जेंव्हा अठरा वर्षाचा झाला तेंव्हा त्याला फक्त चार हजार रुपये देऊन केरळमधील कोचीला दोन वर्षांसाठी पाठविले. तू वडिलांचे नाव च ओळख न सांगता जीवन जगून दोन वर्षांनी परत ये. असे संस्कार व अशी ट्रेनिंग मुलांना दिल्यावर त्यांना पैशाची व्हॅल्यू कळून ते अतिश्रीमंत न झाले तरच नवल. अशी वागणूक आपण आपल्या मुलाला देऊ शकू का? असो ! मारवाडी गुजराती त्यांच्या मुलांना नेहमी सांगतात मंजिल को तू मत भूल ! कदम मिलाकर चल ! सफलता तेरी चरण चुमेगी आज नही तो कल ! आज नहीं तो कल !
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
