६८.वैयक्तिक शोध व वैयक्तिक विकास : Personal R&D

६८.वैयक्तिक शोध व वैयक्तिक विकास : Personal R&D

यशस्वी होण्यासाठी जगात सर्वात मोठी अडचण कोणती असेल तर ती आपली स्वतःची. जगात कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकात काहीतरी उणिवा असतात. त्याचाच शोध घेऊन त्याचाच विकास करणे यालाच Personal R&D पर्सनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा वैयक्तिक शोध व वैयक्तिक विकास म्हणतात. मोठ्या उद्योग व्यवसायात R&D नावाचा विभागच असतो. म्हणूनच आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम स्थानावर जाण्यासाठी आपणासही वैयक्तिक शोध घेऊन वैयक्तिक विकास करावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम मी कोण आहे?, Who am I? माझा जन्म कशासाठी झाला आहे व मला जीवनात काय मिळवायचे याचा शोध घेऊन विकास करावा लागेल.

बऱ्याच वेळा नोकरीच्या मुलाखतीत तुमचे SWOT अॅनालिसिस करायला सांगतात. SWOT मधील S म्हणजे Strength, तुमची ताकद कशात आहे, तुमचे प्लस पॉइंट काय आहेत. W म्हणजे विकनेस, तुमची कमजोरी, कमकुवत बाजू कोणत्या आहेत. ० म्हणजे अपॉर्चुनिटी, तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्या संधी दिसतात व T म्हणजे Threaten तुम्हाला भीती कशाची वाटते. खरं तर हा पर्सनल R&D चाच प्रकार असतो. आपण आपले SWOT अॅनालिसिस केल्यास आपल्या कमकुवत बाजू शोधून त्यावरच विजय मिळवून जीवनात यशस्वी व्हायचे असते.
R&D साठी तुम्ही तुमचे आत्मपरीक्षण केल्यास तुम्ही कोणत्या क्षेत्रात कमी आहात. त्यावर परत परत काम केल्यास त्या क्षेत्रात आपण मास्टर बनू शकतो.

हे केल्यास आपण आपल्या क्षेत्रात ८०-९० व्या स्थानावर जरी असलो, तरी वैयक्तिक शोध व वैयक्तिक विकास करून आपण पहिल्या ५-१० व्या स्थानी येऊ शकतो. व हे काम तीच व्यक्ती करू शकते, जिच्याकडे मोठे ध्येय आहे व यशस्वी होण्याची प्रखर इच्छाशक्ती अर्थात बर्निंग डिझायर असते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!