६९ .८०:२० चा फॉर्म्युला

६९ .८०:२० चा फॉर्म्युला

जगात २० टक्के लोक श्रीमंत आहेत, तर ८० टक्के लोक गरीब आहेत. याचा अर्थ असा, की ८० टक्के संपत्ती ही २० टक्के लोकांकडे तर २० टक्के संपत्ती ही ८० टक्के लोकांकडेच असते. हा नियम आहे. २० टक्के ग्राहक हे ८० टक्के खरेदी करतात. २० टक्के डिलर हे ८० टक्के धंदा करतात. २० टक्के कलाकारांना ८० टक्के चित्रपटात काम मिळते. २० टक्के ग्राहक ८० टक्के तक्रारी करतात. २० टक्के चांगल्या सवयी ८० टक्के चरित्र घडवितात. २० टक्के गुन्हेगार हे ८० टक्के गुन्हे करतात. २० टक्के योग्य निर्णय ८० टक्के जीवन बदलतात. म्हणूनच आपला जन्म ८० टक्क्यांत झाला असला तरी बडी सोच, कड़ी मेहनत और पक्का इरादा असला की आपण २० टक्क्यांत येऊ शकतो. हा माझा स्वानुभव आहे. मी २० टक्क्यांत आलो. तुम्हीही या व जीवनात यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!