६८.वैयक्तिक शोध व वैयक्तिक विकास : Personal R&D

६८.वैयक्तिक शोध व वैयक्तिक विकास : Personal R&D

आपली योग्यता ही आपल्या स्नायूसारखी असते. जर आपण आपले स्नायू, मसल्स डेव्हलप करू शकतो! तर आपण आपली योग्यताही डेव्हलप करू शकतो. समजा आपणास बॉडी बिल्डर बनायचे असेल तर त्यासाठी दररोज २-४ तास जिम मध्ये जाऊन घाम गाळावा लागेल. अशीच प्रॅक्टिस वर्ष दोन वर्षे केल्यास आपले मसल्स, स्नायू, आपली बॉडी स्ट्राँग झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः आपल्या उजव्या हातात जास्त ताकत असते. कारण आपण त्याच हाताचा उपयोग जास्त करतो. म्हणूनच

आपणास ज्या क्षेत्राचा विकास करायचा आहे. त्याच क्षेत्रातील तेच तेच काम परत परत करीत राहिलो तर आपण त्या क्षेत्रात माहीर झाल्याशिवाय राहणार नाहीत. खेळल्याशिवाय जिंकता येत नाही, जर आपण खेळ खेळलोच नाही तर जिंकण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून आज जरी तुम्ही एखाद्या खेळात जिंकत नसाल तरी तोच तोच खेळ खेळत राहिल्यास एक ना एक दिवस त्या खेळात तुम्ही जिंकणारच.

R&D साठी वैयक्तिक जागृती Self Awareness तुम्हाला वाढवावी लागेल. त्यासाठी उघडा डोळे बघा नीट. आपणास चापलुसकी, अर्थात खोटी प्रशंसा करणाऱ्यांपासून दूर राहावे लागेल. जवळच्या मंडळींना आपल्या चुका दाखवण्यास सांगा. त्याचा शोध घेऊन त्या सुधारणे म्हणजेच R&D. आपण
२० वर्षांपर्यंत जे शिक्षण घेतो, त्यापेक्षा महत्त्वाचे २० ते ४० वर्षे या काळात जास्तीचे व महत्त्वाचे शिकायचे असते. त्याच काळात आपण योग्य ज्ञान घेतल्यास, आपले कौशल्य वाढविल्यास, पुढची ४० ते ६० वर्षे हे उत्कर्षाचे, आनंदाचे व एक्साईटेड जातात. म्हणून या काळात जास्त जागरूक राहून शोध व विकास करावा.

स्वतःवर काम करा (Self Improvement) : असे म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज बोये बबूल का, आम कहा से आये !

बीज म्हणजे आपला विचार, तो जर शुद्ध व पॉवरफुल असेल तर आपणास सर्वोत्तम यश मिळू शकते. त्यासाठी सेल्फ इम्प्रूवमेंट अर्थात स्वतःवरच काम करावे लागेल. स्वतःमध्ये चांगले बदल करणे ही एक चांगली सवय असते. ही एक रेग्युलर प्रोसेस असते. मागील वर्षापेक्षा चालू वर्षात व चालू वर्षापेक्षा पुढील वर्षात आपणामध्ये गुणात्मक बदल करावे लागतील. त्यासाठी आपले ज्ञान व संगत यामध्ये चांगली वाढ करावी लागेल. ज्ञानामधील गुंतवणूक ही जगात सर्वात जास्त रिटर्न्स देणारी असते. ज्ञानामुळेच सर्वसाधारण माणूस हा असामान्य बनू शकतो. ज्ञान हाच यशाचा मूळ मंत्र आहे. त्यामध्ये थोडी थोडी प्रगती केली तरी त्याचे परिणाम फार मोठे मिळतात.

तुम्ही फक्त दररोज अर्धा तास पण नित्याने वाचनाची सवय लावा. २४ तासांच्या दिवसात म्हणजेच १४४० मिनिटांत फक्त ३० मिनिटे म्हणजे दिवसाला फक्त दोन २ टक्के वेळ वाचनासाठी दिल्यास, एका महिन्यात ९०० मिनिटे तर वर्षभरात १०,९५० मिनिटे वाचनासाठी मिळतील व त्यामधून तुम्ही वर्षभरात ३०-४० पुस्तके नक्की वाचाल. त्यामुळे प्रचंड ज्ञान मिळवून अशक्य वाटणारे ध्येय सुद्धा आपण सहज साध्य करू शकता. हा माझा स्व अनुभव आहे.

छोटे पण सततच्या प्रगतीने यशामध्ये किती प्रचंड फरक पडतो, त्यासाठी
टेनिस प्लेयर नोवाक झोकावीच याचे उदाहरण फारच महत्त्वाचे आहे. टेनिस हा खेळ वैयक्तिक खेळात सर्वात जास्त पैसे देणारा आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन, यू.एस. ओपन व फ्रेंच ओपन या चार ग्रैंड स्लॅम स्पर्धा मध्ये जिंकणाऱ्या खेळाडूंना सर्वात जास्त पैसे मिळतात.

नोवाक झोकावीचा जन्म सर्वसाधारण कुटुंबात झाला. तो २००१ ते २००५ पर्यंत सरासरी ४९ टक्के पॉइंट जिंकत होता. तेव्हा तो ४९ टक्के मॅचेस जिंकून जागतिक क्रमवारीत ६७९ स्थानावर होता व त्याला ०.३ मिलियन डॉलर म्हणजे साधारण अडीच कोटी रुपये मिळत होते. पुढे त्याने २००६ ते २०१० या काळात थोडीशी प्रगती केली म्हणजे तो आता ४९ टक्के ऐवजी ५२ टके पॉइंट्स जिंकू लागला व त्यामुळे ७९ टक्के मॅचेस जिंकून वर्ल्ड रँकिंगमध्ये तो तिसरा आला. तर २०११-२०१५ या काळात त्याने आणखी थोडी प्रगती केली. म्हणजे तो आता ५२ टक्के ऐवजी ५५ टक्के पॉइंट्स जिंकू लागला. त्यामुळे तो ९० टक्के मॅचेस जिंकायला लागला व तो जगातला नंबर वन रॅकिंगवरील खेळाडू बनला. त्यामुळे त्याला १४ मिलियन डॉलर म्हणजे ११५ कोटी रुपये इतका प्रचंड फायदा झाला. त्यामुळेच नोवाक जोकोविचने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. वरील दोन्ही उदाहरणे हे R&D. अर्थात वैयक्तिक शोध व वैयक्तिक विकासाचे आहेत. यावरून हे सिद्ध होते की तुमच्यामध्ये तुम्ही थोडी थोडी प्रगती केली तर परिणाम मात्र प्रचंड मोठा होतो. म्हणून तुम्ही तुमच्या मध्ये वैयक्तिक शोध घेऊन वैयक्तिक विकास केल्यास तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकता.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!