६. वेगाने पुढे जाण्यासाठीचा सिद्धांत

६. वेगाने पुढे जाण्यासाठीचा सिद्धांत

राजे आपणाला जर वेगाने आपल्या ध्येयापर्यंत जायचे असेल तर खालील तीन पर्याय तयार ठेवा.

१) आपले वजन कमी करा.

२) कामावर फोकस करा.

३) ऊर्जा वाढवा.

तर आपले वजन कमी करा याचा अर्थ आहे अनावश्यक अभिमान कमी करा. अभिमानी माणूस मागे पडतो. स्वाभिमानी पुढे जातो. ज्याला जेवढे लांब जायचं तेवढे त्याने हलके व्हायचे असते. म्हणून पहा भाला लांब जातो बाण त्यापेक्षाही लांब जातो. तसं आपण शरीराने काटक रहा. आपले वजन नियंत्रित ठेवा. आपला बांधा कायम सडपातळ राहील याची काळजी घ्या. क्षेपणास्त्र आणि अंतराळयान यांना देखील हाच नियम असतो. क्षेपणास्त्र आणि अंतराळयान जसजसे पुढे जाते तसतसे ते आपले वजन आणखी कमी करत जाते. वजन कमी करण्याचा हा नियम पाळल्यानेच क्षेपणास्त्र आणि अंतराळयाने हजारो कि.मी.चा पल्ला गाठतात तसेच आपण रहायचे. निंदा, टीका हे कानावर पडते तर आणखी इतके व्हायचे आणि पुढे जात रहायचे. तेव्हा हलके व्हा, जास्त उंची गाठा. वजनदार रहाल तर जागेवरच रहाल.

दुसरे म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा म्हणजे फोकस करा. फोकस करणे म्हणजे अनावश्यक कामे कमी करणे आणि आवश्यक कामावर अधिक लक्ष देणे. कामावर फोकस केला की आपला वाया जाणारा वेळ वाचतो, ऊर्जा वाचते. आपला प्रतिरोध कमी होतो. आणि वेग वाढतो म्हणूनच. पहा लांब फेकला जाणारा भाला आणि दूरपर्यंतचे लक्ष वेध घेणारा बाण हे टोकदार असतात. ते वाऱ्याचा प्रतिरोध कमी करणे आणि लक्ष्यभेद
करणे या दोन कारणासाठीच. तसं आपण आपली ऊर्जा आणि वेळ यांचं अचूक गणित बसवलं की मग लक्षवेध आपोआपच होतो.तिसरे म्हणजे आपली ऊर्जा वाढवा. जेवढी जास्त ऊर्जा हातात असेल तेवढा जास्त भाला लांबचे लक्ष्य भेदू शकतो आणि जेवढी जास्त ऊर्जा धनुष्यात असेल तेवढाच बाण लांबचे लक्ष्य भेदन करू शकतो. तोच नियम आपली शारीरिक ऊर्जा, मानसिक, बौद्धिक ऊर्जा यांना सुद्धा लागतो. तेव्हा ऊर्जा प्राप्त करा. ती साठवा आणि ती वाढवत रहा. जेवढी जास्त ऊर्जा तेवढाच जास्त आपल्या प्रगतीचा वेग असतो. किंबहुना आपली ऊर्जाच आपला वेग ठरविते तेव्हा कायम आपली ऊर्जा राखीव ठेवा.या तत्त्वाची आठवण म्हणून महाराजांनी प्रत्येक मराठ्याला भाला हे शस्त्र चालवता आले पाहिजे आणि ते कायम सोबत ठेवले पाहिजे याची सक्ती केली. आजपर्यंत उपलब्ध झालेल्या एकाही चित्रात मराठा सैनिक मग तो घोडदळाचा असो की पायदळाचा बिना भाला नाही.आणि या शिकवणीचा प्रत्यक्ष पुरावा म्हणूनच महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जाताना घोड्यावर न बसता पालखीत बसून गेले आणि पडत्या पावसात घोडखिंड पार करून विशाळगडाला सहीसलामत पोहोचले.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!