५. संभ्रमित नव्हे तर समर्पित माणसे तयार करा.

५. संभ्रमित नव्हे तर समर्पित माणसे तयार करा.

पुरंदरची पहिली लढाई –

बाजी पासलकर यांची सासवड येथे समाधी बांधली. पन्हाळा पायथा नेवापूर येथे शिवाकाशीद यांची समाधी बांधली. घोडखिंडीत शंभूसिंह जाधवराव रायाजी बांदल आणि बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांची समाधी बांधली. सिंहगडावर तानाजी मालुसरे यांची बांधली. बाणूर गडावर बहिर्जी नाईक यांची तर रायगडावर एक निष्ठावंत सेवक मदारी मेहतर याची समाधी बांधली. ही यादी बरीच मोठी आहे. तेव्हा समर्पित लोकांसाठी तुम्ही सुद्धा आपले जीवन समर्पित ठेवा. जेव्हा समर्पित लोक सोबत असतात तेव्हा जगातील कितीही मोठा विजय मिळविता येतो आणि इतिहास घडवता येतो. तेव्हा समर्पित लोक शोधा आणि त्यांच्या पराक्रमाला वाव द्या. उसळीप्रमाणे ओलावा करून सर्वांना बांधून ठेवा. जेव्हा आपणाला एखादे कडधान्य किंवा धान्य मोड येण्यासाठी भिजवावे लागते तेव्हा जर तेच धान्य जर ओल्या फडक्यात घट्ट बांधून जर मोड यायला ठेवले तर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने त्या धान्याला मोड येतात. तेव्हा आपणही स्वराज्य निष्ठारूपी फडक्यात हे सर्व मावळे एकत्र बांधून त्यांना चांगले दिवस यावेत म्हणून एकत्र घट्टपणे कायम सोबत ठेवा. बघा स्वराज्याचा अंकूर वेगाने वाढतो की नाही. जिजाऊ मातेच्या या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांनी बालपणापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत सतत हरहुन्नरी माणसं जोडून ती स्वराज्याच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कायम निष्ठेच्या ओलाव्याने बांधून ठेवली. तेव्हा आपणही असेच माणसं जोडत चला. माणसं वाढवत चला. माणसं जोपासत चला.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!